पद्मश्री पुरस्कार प्राप्त गिरीष प्रभुणे व बिजमाता राहीबाई पोपेरे यांचा होणार भव्य सत्कार; 2 डिसेंबर ला STAR AWARD 2021 चे आयोजन
पिंपरी-चिंचवड
प्रतिनीधी
दि.01/12/2021
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व आपला आवाज न्यूज नेटवर्क चे आयोजन.
भारत सरकार ने पिंपरी-चिंचवड येथील गुरूकुलम संस्थेचे अध्यक्ष गिरीष प्रभुणे व नगर जिल्ह्य़ातील बिजमाता राहीबाई पोपेरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल कृतज्ञता सत्कार समारंभ व PCMC STAR AWARD 2021 च्या वितरण सोहळ्याचे आयोजन आपला आवाज न्यूज नेटवर्क व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने रामकृष्ण मोरे सभागृह चिंचवड येथे दि.2 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:00 वाजता करण्यात आले असल्याची माहीती पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष अतुल परदेशी यांनी दिली.
फेसबूक ग्रुप च्या माध्यमातून ज्या महिलांनी अनेक महिलांना व्यवसाय व व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली अशा महिलांना PCMC STAR AWARD 2021 हा पुरस्कार पद्मश्री पुरस्कार प्राप्त गिरीष प्रभुणे बिजमाता राहीबाई पोपेरे,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे,कोहिनूर ग्रुप समुहाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल,आपला आवाज न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक अतुल परदेशी यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येणार असून या कार्यक्रमास आई कुठे काय करते मालिका फेम रूपाली भोसले (संजना)यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहीती आपला आवाज आपली सखी च्या संचालिका संगीता तरडे यांनी दिली.
PCMC STAR AWARD 2021 या सन्मान सोहळ्यात पद्मश्री पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या सत्कार समारंभा सोबतच आपला आवाज आपली सखी च्या सभासदांसाठी खास सेलिब्रेटी गप्पा टप्पाचेही आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे फोरम पार्टनर आहे आपला आवाज आपली सखी तर रेडीओ पार्टनर आहे FM बोले तो रेडीओ सीटी 91.1 व सह प्रायोजक आहेत कोहिनूर ग्रुप,कुकवेल फुड तरी या कार्यक्रमास आपला आवाज आपली सखी च्या सर्व सभासद व आपला आवाज न्यूज नेटवर्क च्या प्रेक्षक व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आपला आवाज न्यूज नेटवर्क चे विभागीय संपादक रोहित खर्गे यांनी केले आहे.