विजेच्या तारांमुळे दहा ते बारा एकर ऊस जळून खाक

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
१२ नोव्हेंबर २०२१ 

आळेफाटा


शेतकऱ्यांच लाखो रुपयांच नुकसान

आळे येथील लवणवाडी वस्तीवर विजेची तार तुटून बारा एकर ऊस जळाल्याची घटना शुक्रवार (दि.१२) दुपारच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आळे (ता.जुन्नर ) येथील लवणवाडी मळयामधील मंगेश कु-हाडे, भागाजी कु-हाडे,प्रविण कु-हाडे,चंद्रकांत कु- हाडे,प्रभाकर कु-हाडू,सचिन कु-हाडे व सुदाम संभेराव या शेतक-यांचा दहा ते बारा एकर ऊस असु या ठिकाणाहून गेलेल्या विजेच्या तारांमधुन ठिणग्या पडल्या व या ठिणग्याचे रूपांतर आगीत होऊन मोठा जाळ होऊन संपुर्ण शेताला हि आग लागल्यामुळे सर्वच ऊस जळुन गेला आहे .तसेच या ठिकाणी लागलेली आग हि मोठी होती स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यातून हि आग आटोक्यात आणण्यात आली.

नुकसानभरपाई महावितरणाने द्यावी:- ग्रामपंचायत सदस्य मंगेश कुऱ्हाडे

दरम्यान या ठिकाणी असलेला संपुर्ण ऊस तुटायला आला होता. हा ऊस जळाल्याने येथील सर्व शेतक-यांचे अठरा ते विस लाख रूपयांचे नुकसान झालेले. तसेच यापूर्वीही गेली तिन वर्षापासुन या ठिकाणी असलेला ऊस विजेच्या तारांमुळे पेटलेला आहे. येथील शेतक-यांणी महावितरण कंपनीकडे येथील दोन खांबामधील तारांमध्ये पडलेला जोळ काढावा अशी विनंती वारंवार करून कंपनीने या कडे दुर्लक्ष केलेले आहे.महावितरण कंपनीच्या चुकीमुळेच येथील ऊस जळाला आहे. येथील शेतक-यांचे झालेले नुकसान महावितरण कंपनीनेच द्यावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य मंगेश कु-हाडे यांणी केली असुन या शेतक-यांणा त्यांची भरपाई न मिळाल्यास महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोरच आंदोलन करणार आहोत असा कडक इशारा दिला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *