दि.३ घोडेगाव : – ( प्रतिनिधी -मोसीन काठेवाडी )
आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील बी.डी काळे महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. इंद्रजीत भाऊराव जाधव यांची नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि : शाल शिक्षण मंडळ व जेष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष सल्लागार समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.
प्राचार्य डॉ.इंद्रजीत जाधव यांनी प्राध्यापक म्हणून १० वर्ष सेवा तर प्राचार्य म्हणून २५ वर्ष सेवा केली असून यांचा शैक्षणिक आणि ज्ञानविस्तार कार्यातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर व या विभागाचे प्रमुख डॉ. धनंजय लोखंडे यांनी यांची या महत्वाच्या विभाग सदस्यपदी नियुक्ती केली असून त्यांचे मार्गदर्शन निश्चितच या विभागाच्या उत्कर्षासाठी उपयुक्त ठरणार आहे.

प्राचार्य डॉ. जाधव हे फोरमचे पुणे जिल्हा उपाध्यक्षपद सक्षमपणे सांभाळत आहेत .
त्यांच्या या निवडिबद्दल आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष आजितशेठ काळे , उपाध्यक्ष तुकाराम काळे , कार्याध्यक्ष सुरेश काळे , सचिव अॅड मुकुंदराव काळे ,चेअरमन अॅड संजय अर्विकर तसेच सर्व संचालक आदिनीं अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.