सेवा सारथी आयोजित किल्ले बनवा स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

राजश्री पाटील
बातमी प्रतिनिधी
१३ नोव्हेंबर २०२१ 

शाहूनगर


शाहूनगर ता.१२ : सेवा सारथी आयोजित किल्ले बनवा स्पर्धेचा किल्ले बनवा बक्षीस वितरण समारंभ दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी सहा वाजता पार पडला. पंडित दीनदयाळ उपाध्याय क्रीडा संकुल या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन उद्योजक श्री गंगाधर मांडगे आणि ओंकार मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मान्यवर सन श्वेता शालिनी, सौरभ दिवेकर, संतोष बारणे, निलेश जाधव, अनुराधाताई गोरखे ,अनिकेत शेलार , योगिता नागरगोजे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमावेळी विनोद जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले आर्यन महाजन यांच्या टीमने मर्दानी खेळाचे सादरीकरण केले. किल्ले बनवा स्पर्धेमध्ये पाच उत्कृष्ट पारितोषिके तसेच तीन प्रमुख पारितोषिके देण्यात आली. उत्कृष्ट किल्ला (प्रगती आयकॉन सोसायटी), उत्कृष्ट माहिती( शिवतेज ग्रुप गणपती मंदिर, शिवतेज नगर) उत्कृष्ट सजावट (ऋतुराज सोसायटी ,शाहूनगर) उत्कृष्ट सामाजिक संदेश (सिद्धेश्वर सोसायटी शाहूनगर), उत्कृष्ट सादरीकरण रत्नसिंधू सोसायटी ( संभाजीनगर) तसेच तृतीय पारितोषिक (सूरश्री सोसायटी संभाजीनगर ,विजयदुर्ग) द्वितीय पारितोषिक( रिव्हर रेसिडेन्सी मोशी, सिंधुदुर्ग), प्रथम पारितोषिक शुभंकरोती सोसायटी ( प्रचंडगड) सर्व विजेत्यांना व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

सामाजिक भान राखून समाजासाठी सतत कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्थांना देखील सन्मान कार्यक्रम प्रसंगी करण्यात आला. यावेळी आम्ही गड गोंधळी, सेवा दिप फाउंडेशन, ह्युमॅनिटी सेंट्रल, प्रयत्न सोशल फाउंडेशन, स्टेप फाउंडेशन इत्यादी सामाजिक संस्थांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. किल्ले बनवा स्पर्धेचे परीक्षण गिरीशजी वैद्य आणि प्रवीणजी कोढवडेकर यांनी केले. तसेच योगेश पाठक, पंकज दलाल आर्यन महाजन, पूजा काळे, मृणाली काकडे – भोसले,अभिषेक बोरसे ,श्रीधर कुंभार ,साहिल घुले यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळली.

सेवा सारथी आयोजित किल्ले बनवा स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
सेवा सारथी आयोजित किल्ले बनवा स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *