शरद पवारांच्या ” त्या ” भर पावसात झालेल्या सभेला आज दोन वर्षे पूर्ण

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१८ ऑक्टोबर २०२१

पिपरी


महाराष्ट्रात तीन पक्षीय महाविकास आघाडी सरकार स्थापण झाले आहे. व सुरू आहे त्यामागे वेगळा इतिहास आहे. सत्तेमध्ये येऊ शकत नव्हते असेच चित्र दिसत होते. पुन्हा देवेन्द्र फडणवीस सरकारच येणार असेच चित्र असताना साताऱ्यात राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार यांची ‘ ती ‘भर पावसात ऐतिहासिक सभा झाली. ८० वर्षाच्या योध्याने सगळे चित्रच पालटवल्याचे सर्वांनी पाहिले. त्या गोष्टीला आज १८ ऑक्टोबर रोजी दोन वर्षे पूर्ण झाली. त्याची आठवण होत असल्याचे चित्र व ते पावसात भिजणारे शरद पवार यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

आता विरोधात बसलेले देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते हे सरकार अस्थिर करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. मग ईडी असो की एनसीबी सगळ्या यंत्रणा वापरून रोज विरोधकांच्या घरावर, कार्यालयावर छापे टाकण्याचे काम सुरू आहे. पवारांच्या नातेवाईकांच्या घरावर व कार्यालयावरही छापे सुरू आहेत. हे सरकार पडण्याचा व घेरण्याचा विरोधकांचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे. तुम्ही ईडी लावा . सीबीआय छापे टाका की सगळ्या यंत्रणाचा वापर करा काहीही करा पण हे सरकार भक्कम आहे . तुम्ही कितीही प्रयत्न करा आणि जोर लावा पण हे सरकार कदापि पडणार नाही असे ठामपणे शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड मध्ये सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *