पाच वर्षापासून फरार असलेला,डोंगराळ भागात लपून राहणारा खुनाच्या प्रयत्नातील आरोपी अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद…
आंबेगाव : –
मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी रेकॉर्डवरील पाहिजे,फरार आरोपी शोधून त्यांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार आज दिनांक ११/०९/२०२१ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मंचर घोडेगाव परिसरात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,घोडेगाव पोलीस स्टेशन गु.र.नं ११०/२०१७ भादवि कलम ३०७,३२६,३२४,१४३,१४७,१४८,१४९,३२४,५०४,५०६ मधील फरार आरोपी सोमनाथ उर्फ भोरु अरुण तळपे वय २५ वर्ष रा. करवंदीदरा गोहे बु. ता आंबेगाव जि. पुणे हा गोहे गावातील आश्रम शाळेजवळ येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळताच सदर ठिकाणी सापळा लावून एक संशयित इसम ताब्यात घेतला असता,त्यास नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सोमनाथ उर्फ भोरू अरुण तळपे असे सांगितले.त्याची वैदकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी घोडेगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक,डॉ. अभिनव देशमुख साो. मा.अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, मा.उपविभागीय पोलीस अधीकारी श्री.लंभाते सो.यांचे मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे,पोलिस हवालदार दिपक साबळे विक्रम तापकिर ,पोलिस नाईक संदिप वारे ,पोलिस शिपाई अक्षय नवले,निलेश सुपेकर,प्रसन्न घाडगे.पोलीस मित्र प्रसाद पिंगळे यांनी केली आहे.