आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते रिक्षा व वाहन चालकांना मोफत गणवेश वाटप…

वर्षभरापासून करोनामुळे रिक्षाचालकांचे आर्थिक गणित बिघडले..

रोहित खर्गे
विभागीय संपादक

चिंचवड – दि १३ सप्टेंबर २०२१
कोरोना काळात लॉकडाऊनमुळे रिक्षा व वाहन चालक यांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे.मदतीचा हात म्हणून आज (दि.१३) चिंचवड विधानसभेचे विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप व महापौर माई ढोरे यांच्या हस्ते सांगवी येथील बॅडमिंटन हॉल पी डब्ल्यू डी ग्राउंड येथे रिक्षा व वाहन चालकांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार जगताप म्हणाले,मागील वर्षभरापासून करोनामुळे रिक्षाचालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमध्ये रिक्षाव्यवसाय पूर्णपणे बंद होता.

त्यामुळे रिक्षाचालकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. त्यानंतर लॉकडाउनमध्ये शिथिलता येत गेल्यानंतर रस्त्यावर रिक्षा धावू लागल्या. मात्र, ‘वर्क फॉर्म होम’ तसेच करोनाच्या भीतीमुळे नागरिक प्रवास करणे टाळत असल्याने प्रवासी मिळेनासे झाले. त्यात बरेच दिवस सर्वसामान्यांसाठी लोकलसेवादेखील बंद असल्याने याचाही फटका रिक्षाचालकांना बसला होता. त्यामुळे दररोजच्या उत्पन्नामध्ये घट झाल्याने घरखर्च तसेच बँकेचा हप्ता भागवणे रिक्षाचालकांना अवघड झाले. करोना साथीला वर्ष झाले असून अद्यापही रिक्षाव्यवसाय पूर्णपणे रुळावर आलेला नाही.कोरोना काळात रिक्षाचालकांना गणवेश देण्याचे आश्वासन मी दिले होते त्यामुळे आज त्यांना मोफत गणवेश वाटप देण्यात आले आहेत.भारतीय जनता पार्टी नेहमी रिक्षा व वाहन चालकाच्या पाठीशी उभी आहे असेही ते म्हणाले.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेली टाळेबंदी शिथिल केली जात आहे. रिक्षा चालकांना देखील सामाजिक अंतर आणि योग्य खबरदारी घेऊन प्रवासी वाहतूक करण्यास मुभा देण्यात आली आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे स्वतःची काळजी घेऊन रिक्षाचालकांनी रिक्षा चालवावा असे आवाहन महापौर माई ढोरे यांनी यावेळी केले.

यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे , माजी स्थायी समिती अध्यक्ष विलास मेडीगिरी नगरसेवक हर्षल ढोरे-नगरसदस्य, नगरसेविका शारदा सोनवणे संकेत चोंधे, संतोष ढोरे, हिरेन सोनवणे, आप्पा ठाकर, धनंजय ढोरे, शुक्ला सर,श्री.विशाल कलाटे, दत्ता यनपुरे, कृष्णा भंडलकर,भुषण शिंदे, सौ.दर्शना कुभांरकर, गणेश काची ई उपस्थितीत होते.
या कार्यक्रमाचे निमंत्रक श्री.जवाहर ढोरे,सांगवी रिक्षा संघटने तर्फ शशिकांत कुभांर व सुनिल कुभांर यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांचे आभार मानले.
सूत्रसंचालन नामदेव तळपे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *