शिंदेवाडीत जवानाच्या आई वडिलांच्या हस्ते ध्वजारोहण…
आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
दि.16/8/2021
शिंदेवाडीत जवानाच्या आई वडिलांच्या हस्ते ध्वजारोहण
बातमी:-रामदास सांगळे,विभागीय संपादक,जुन्नर
शिंदेवाडी:- शिंदेवाडी ग्रामपंचायत (ता.जुन्नर) कार्यालयाचे ध्वजारोहण सरपंचाच्या हस्ते न करता भारतमातेचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या हस्ते करण्यात यावं या संकल्पनेनुसार
ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण शिंदेवाडी गावचे भारतीय लष्करात कार्यरत असलेले व सध्या आसाम-गुहावटी येथे रुजू असलेले सुपुत्र मेजर शंकर कारभारी निकम यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या आई आनंदी कारभारी निकम व वडील कारभारी बजाबा निकम यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच शिंदेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे झेंडावंदन माजी सैनिक संदीप भाऊ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
तर व्हरूंडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे झेंडावंदन फौजी तान्हाजी बळवंत शिंदे यांच्या अनुपस्थितीत त्यांची आई जनाबाई बळवंत शिंदे व वडील बळवंत राजू शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले असल्याची माहिती गावचे सरपंच एम.डी.पाटील शिंदे यांनी सांगितले.