ग्रामोन्नती मंडळाच्या महाविद्यालयात 75 व्या अमृत महोत्सवी एन.सी.सी. दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
०१ डिसेंबर २०२२

नारायणगाव


नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय नारायणगाव, तसेच डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाऊंडेशन नारायणगाव व शिवनेरी ब्लड बँक मंचर त्याचबरोबर राष्ट्रीय छात्र सेना विभाग व 36 महाराष्ट्र बटालियन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी संपूर्ण देशभरात राष्ट्रीय छात्र सेना दिन साजरा करण्यात येतो त्या पाश्र्वभूमीवर दि. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी ७५ वा अमृतमहोत्सवी राष्ट्रीय छात्र सेना दिन भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून साजरा करण्यात आला. सदर शिबिरात एकूण ६१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यात राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागातील विद्यार्थ्यानी रक्तदान केले. त्याचबरोबर नारायणगाव परिसरातील ग्रामस्थ, राष्ट्रीय छात्र सेनेचे माजी विद्यार्थी, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचाही मोलाचा सहभाग लाभला.

याठिकाणी प्रत्येक रक्तदात्यास 32 GB पेन ड्राईव्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर प्रत्येक रक्तदात्यास अल्पोपाहार देखील देण्यात आला. सदर रक्तदानासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य शेवाळे एस. एस., उपप्राचार्य होले जी. बी., त्याचबरोबर राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख ए. एन.ओ. कॅप्टन. डॉ. दिलीप शिवणे, प्रा. सचिन काशिद, प्रा. आनंद कुलकर्णी, प्रा. आकाश कापले (कला शाखा समन्वयक व प्रमुख ), प्रा. शिवाजी टाकळकर (वाणिज्य शाखा समन्वयक व प्रमुख ), प्रा. मेहेर आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर नुकताच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे ( MPSC ) घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये राज्य विक्रीकर निरीक्षक ( STI ) पदी निवड झालेल्या कु. विवेक संजय वायकर यांची देखील उपस्थिती होती. यावेळी” रक्तदान करा, एक जीव वाचवा! एक थेंब रक्ताचा, फुलवेल अंकुर जीवनाचा! कधी आटत नाही रक्ताचा झरा, दर तीन महिन्यांनी रक्तदान करा! ” हा मोलाचा संदेश राष्ट्रीय छात्र सेना विभाग, नारायणगाव तर्फे देण्यात आला.

ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नारायणगाव येथे राष्ट्रीय छात्र सेना विभाग यांच्या वतीने विवेक संजय वायकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये विक्रीकर निरीक्षक (STI) या पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एस. शेवाळे, उपप्राचार्य जी. बी. होले, कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. मिलिंद भुजबळ त्याचप्रमाणे राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे प्रमुख ए. एन. ओ. कॅप्टन डॉ. दिलीप शिवणे, प्रा. सचिन काशिद, प्रा. आनंद कुलकर्णी, प्रा. आकाश कापले (कला शाखा समन्वयक व प्रमुख ), प्रा. शिवाजी टाकळकर (वाणिज्य शाखा समन्वयक व प्रमुख ), प्रा. मेहेर आदी मान्यवर उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *