जांभोरी येथे 250 जणांना कोरोना प्रतिबंधक लस…
भिमाशंकर
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
जांभोरी ता.आंबेगाव येथे 18 वर्षा पुढील 250 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण व अँटीजेन टेस्ट मोहीम राबवण्यात आली त्यामध्ये येथे 18 ते44 वयोगटातील जणांना पहिला व 45 वर्षापुढील जणांना दुसरा डोस देण्यात आला लसीकरणासाठी नागरिकांना चांगला प्रतिसाद दिल्याचे आदिवासी समाजाचे युवानेते मारुती दादा केंगले यांनी सांगितले यावेळी लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. भाविका शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेविका वर्षा मसळे आशावर्कर मनिषा केंगले वर्षा केंगले एस के मिडगुळे यांनी पाहिले तसेच या प्रसंगी पोलिस पाटील नवनाथ केंगले युवानेते मारुती दादा केंगले विकास पोटे प्रकाश केंगले सागर काठे लक्ष्मण केंगले जांभोरी ग्रामस्थ यांनी लस घेतली