आमदार अतुल बेनके यांना दिव्यांगांच्या मागण्याचे निवेदन…

प्रतिनिधी-कैलास बोडके

आमदार अतुल बेनके यांना दिव्यांगाच्या विविध मागण्यांचे निवेदन प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष विलास सोनवणे, महिला तालुका अध्यक्ष मंगलताई हांडे/गांजवे, सचिव गोविंद कुतळसर, विभाग प्रमुख महेंद्र फापाळे, कार्याध्यक्ष देविदास उनकुले, पुष्पाताई गोसावी आदिंच्या उपस्थितीत देण्यात आले.

Advertise


दिव्यांगांना त्यांचे हक्क मिळून देण्यासाठी तालुक्यातील आठ संघटना एकत्र येऊन जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही, त्यासाठी हे निवेदन देण्यात आले यामध्ये दिव्यांगांना रोजगार मिळण्यासाठी आयोजन, पंचायत समिति तहसिल कार्यालय येथील पत्रव्यवहारांची दखल घेणे, संजय गांधी समितीवर प्रहार संघटनेचा एक प्रतिनिधि घेणे, दिव्यांग भावन मिळावे, १५ व्या वित्त अयोगतून ५ % निधी राखीव ठेऊन दिव्यांगासाठी खर्च करवा, स्थानिक स्वराज्य संस्थेत एक स्वीकृत सदस्य देण्यात यावा, ६५ वर्षों व त्यापुढील वृद्धाना श्रावणबाळ निवृती वेतन मिळावे, पिंपरी पेंढार येथील दिव्यांगांनी अर्ज करूनही २० वर्षापासून व्यवसायासाठी गाळा देण्यास टाळाटाळा करून धनदांडग्याना गाळ्यांचे वाटप झाले आहे याची दखल घेणे या मगण्याचे निवेदन यावेळी देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *