पुणे जिल्ह्यातील हॉटेल व्यवसाय व अन्य उद्योगधंदे संध्याकाळी 11 वाजेपर्यंत चालू ठेवावे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम कडक करावे.- गजानन बाबर माजी खासदार मावळ…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी चिंचवड तसेच पुणे शहरातील व्यापाऱ्यांच्या , छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या , किरकोळ विक्रेत्यांच्या ,हॉटेल चालकांच्या वतीने आपणास विनंती करू इच्छितो की, आपण वास्तविकता जर पाहिली तर निश्चितपणे पुणे जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत ही वस्तुस्थिती आहे , परंतु त्यामुळे हॉटेल व्यवसाय संध्याकाळी 8 पासून सकाळी 7 पर्यंत बंद ठेवणे , तसेच इतर छोट्या-मोठ्या उद्योगांनाही उपरोक्त कालावधीमध्ये परवानगी नाकारणे हे योग्य ठरणार नाही. असे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार
यांना दिले.

हॉटेल  व्यावसायिकांचा खरा व्यवसाय हा संध्याकाळी 8 वाजल्यापासून चालू होतो, आणि जर आपण 8 वाजता त्यांना हॉटेल बंद करण्यास सांगितले, तर त्यांच्या सहित त्यांच्या हॉटेलमध्ये कामावर असणारे कामगार यांच्यावरही त्याचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होईल तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्र हे औद्योगिक क्षेत्र असल्याने असंघटित कामगार लाखोंच्या संख्येने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये वास्तव्याला आहेत त्यांना संध्याकाळी जेवण हॉटेलमध्ये करावे लागते व जर आपण बंद केले तर त्यांना एक टाइमचे जेवण हि मिळणार नाही तसेच धंदाच नसल्यामुळे हॉटेलमध्ये कामावर असणारे कामगार यांच्यावरही आर्थिक कुर्‍हाड कोसळेल याची जाणीव या पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री या नात्याने आपण करावी ही मी आपणास नम्र विनंती करतो.

हॉटेल व्यवसायिक हे एक्साईज कर भरतात, एक्साईज ड्युटी कर स्वरूपात राज्याला मिळते व यातून राज्याचा विकास व्हायला मदत होते जर हॉटेल चालकांचे जर व्यवसायात चालले नाहीत तर ते एक्साईज कर कुठून भरणार याचाही आपण विचार केला गेला पाहिजे तसेच माननीय मंत्री महोदय या हॉटेल बरोबरच छोटे-मोठे अन्य उद्योग उदाहरणार्थ भाजीपाला व्यवसाय असेल किरकोळ विक्रेते असतील यांचाही वरील वेळेत बंद केला तर त्यांच्यावरही उपासमारीची वेळ येईल मग सर्वसामान्य जनता कोरोना ऐवजी त्यांना उपासमारीचा सामना करावा लागेल याचीही आपण खबरदारी घ्यावी ही मी आपणास नम्र विनंती करतो.

वरील सर्व बाबी पाहता माझी आपणास नम्र विनंती आहे की दुकानाबाहेर सोशल डिस्टंसिंग करून, मास्क चा वापर, सॅनिटायझर चा वापर योग्य रीतीने केला तसेच दुकानाबाहेर ठराविक ठरावीक संख्येतच उभे राहण्याचे आदेश दिले तसेच याला जबाबदार तेथील दुकानांना धरले जाईल असे सांगण्यात आले तर निश्चित रूपाने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होईल व कामगारांवर तसेच उद्योगधंद्यांवर त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होणार नाही याचाही आपण विचार करावा, आपण जर आज पाहिले तर हॉटेल मधील कामगार तसेच छोटे-मोठे व्यवसायिक, किरकोळ विक्रेते हे परप्रांतीय आहेत ते जर एकदा सोडून गेले तर महाराष्ट्रामधील व्यवसायिकांना मोठ-मोठ्या औद्योगिक क्षेत्राला कामगार मिळणार नाहीत व यामुळे याचा फटका बांधकाम व्यवसायिक असतील ,औद्योगिक कंपन्या असतील , इतर उद्योग असतील यांना बसेल  व एकंदरीत  याचा परिणाम  जनसामान्य नागरिकांवर होईल याचाही विचार आपण केला गेला पाहिजे आणि म्हणून माझी आपणास नम्र विनंती आहे की आपण हॉटेल्स असतील किंवा छोटे-मोठे व्यापारी असतील त्यांच्यावर निर्बंध / नियम निश्चितपणे कडक करावे, परंतु त्यांना व्यवसाय करण्यासाठी मुभा संध्याकाळी 11 वाजेपर्यंत आपण देण्यात यावी, जेणेकरून बेरोजगारी, कामगारांचा जेवणाचा प्रश्न, व्यावसायिकांचा कराचा प्रश्न, छोट्या-मोठ्या उद्योगांवर होणारा परिणाम यामुळे त्यांची होणारी उपासमार, आर्थिक कोंडी, दैनदिन उपजीविका हे प्रश्न सुटू शकतील म्हणून आपण यावर जाणीवपूर्वक निर्णय घ्यावा अशी मी पुणे जिल्ह्यातील हॉटेल्स , छोटे-मोठे व्यापारी , किरकोळ विक्रेते  यांच्या वतीने आपणास विनंती करतो. असे निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *