झी टॉकीज प्रस्तुत मन मंदिरा गजर भक्तीचा किर्तन रुपी सोहळा ओझर या ठिकाणी संपन्न

ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके

दि.३ ० जानेवारी २०२३

 

श्री क्षेत्र ओझर येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री गणेश जयंती उत्सव तसेच झी टॉकीज प्रस्तुत “मन मंदिरा मन” , “मंदिरा गजर भक्तीचा” हा प्रवचन व कीर्तन सोहळा अतिशय मंगलमय वातावरणात या ठिकाणी संपन्न झाला. दिनांक 22 जानेवारी ते 29 जानेवारी या आठ दिवसात अनेक हुशार ,दिग्गज ,अभ्यासू व गोड गळा असणाऱ्या, अनेक दिग्गज व नामवंत कीर्तनकारांनी या मन मंदिरा गजर भक्तीच्या कार्यक्रमांमध्ये आपली किर्तन रुपी , प्रवचन रुपी सेवा , विघ्नहर चरणी अर्पण केली. यामध्ये ह. भ. प. रुपाली दीदी सवणे, ह. भ. प. पुरुषोत्तम दादा पाटील, ह. भ. प. समाज प्रबोधनकार संग्राम बापू भंडारे, ह. भ. प. गणेश महाराज वाघमारे, ह. भ. प. भाऊसाहेब महाराज पन्हाळकर, ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे, ह. भ. प. शालिनीताई देशमुख, ह, भ. प. नेहा ताई भोसले/ साळेकर व ह. भ. प. प्रवीण महाराज डोळे पाटील या दिग्गज नामवंत अभ्यासू प्रवचनकारांनी आपली प्रवचन रुपी सेवा या ठिकाणी अर्पण केली.

 

भक्ती गुरुकुल संस्था आळंदी देवाची यांच्या वतीने गंभीर महाराज अवचार यांनी आठ दिवस पखवाज रुपी सेवा अर्पण केली. विघ्नहर सांस्कृतिक भवन मध्ये हा भव्य कीर्तन सोहळा संपन्न झाला. या सांस्कृतिक भवन च्या प्रवेशद्वारा जवळ विठ्ठल रुक्माई ची भव्य दिव्य मूर्ती उजव्या बाजूला संत तुकाराम व डाव्या बाजूला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची भव्यदिव्य मूर्ती सर्वांची नजर वेधून घेत होती. विघ्नहर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष गणेश भाऊ कवडे, त्यांचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मंडळी ओझर यांच्या वतीने चोख अशी बसण्याची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था, अन्नदानाची व्यवस्था , लाइटिंग ची व्यवस्थाया ठिकाणी करण्यात आली होती. सातव्या दिवसाची किर्तन रुपी सेवा ह. भ. प. नेहा ताई भोसले /साळेकर भोर यांनी संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत सादर केली. त्यांनी अनेक विषयावर लोकांना समाज प्रबोधन पर दाखले दिले.

आई ,स्त्रीभृण हत्या ,लहान मुलांचा मोबाईलचा वापर ,छत्रपती शिवाजी महाराज , अष्टविनायक गीत व खंडोबाची गाणी त्यांनी यावेळी सर्व लोकांसमोर सादर केली. आपल्या रसाळ आवाजाने रसाळ वाणीने व योग्य असे दाखले देत त्यांनी अक्षरशः श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले नाचावयास भाग पाडले फुगड्या खेळण्यात भाग पाडले अशाप्रकारे आठव्या दिवसाची प्रवचन रुपी सेवा अतिशय खेळीमेळीच्या, भक्तीमय वातावरणात श्रीक्षेत्र ओझर या ठिकाणी संपन्न झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *