शबरी आदिवासी घरकुल योजनेचे आळ्यात एकच लाभार्थी

रामदास सांगळे
विभागीय संपादक
१४ जानेवरी २०२२

बेल्हे


आळे (ता.जुन्नर) ग्रामपंचायतीमध्ये शबरी आदिवासी घरकुल योजना २०२१-२२ अंतर्गत सुरेश यशवंत जाधव यांना घरकुल मिळाले असून नुकतेच त्याचे भूमिपूजन करण्यात आले. जुन्नर गट विकास अधिकारी एस.वाय.माळी यांच्या आदेशानुसार या मंजूर घरकुलाचे लाइनआऊट करून मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. घरकुल लाभार्थी सुरेश जाधव यांना घराची अत्यंत गरज होती. या योजनेच्या माध्यमातून त्यांना घर मिळाल्याने त्यांना अत्यंत आनंद झाला. यावेळी गावचे सरपंच प्रितम काळे,उपसरपंच विजय कुऱ्हाडे, ग्रामसेवक बाळासाहेब वनघरे, सुधाकर काळे आदी मान्यवर उपस्थित होते. शबरी आदिवासी घरकुल योजना गोरगरिबांसाठी वरदान ठरत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *