खासदार राहुल शेवाळे यांचीही होणार SIT चौकशी; बलात्काराच्या आरोपाप्रकरणी निलम गोऱ्हेंनी दिले निर्देश
२२ डिसेंबर २०२२
खासदार राहुल शेवाळे यांनी सुशांतसिंह प्रकरणावरून आदित्य ठाकरेंवर आरोप केल्यानंतर ठाकरे गटदेखील आक्रमक झाला आहे. शेवाळेंना प्रत्युत्तर देण्यासाठी ठाकरे गटाने राहुल शेवाळेंवरील बलात्काराच्या आरोपाचा मुद्दा आज विधानपरिषेदत उपस्थित केला. या मुद्यावरून आज विधानपरिषदेत गरारोळ झाल्याचेही बघायला मिळालं. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी राहुल शेवाळे यांची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी केली.
विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी खासदार राहुल शेवाळे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाचा मुद्दा उपस्थित केला. राहुल शेवाळे यांच्याबद्दल महिलेने गंभीर तक्रार केली आहे. तिच्यावर बलात्कार झाल्याचे आरोप तिने केला आहे. याबाबत तिने मुंबई पोलिसांकडे रितसर तक्रारदेखील दाखल केली आहे. तसेच त्या महिलनेने पंतप्रधान कार्यालय आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडेही तक्रार केली आहे. तिच्या जिवाला धोका असल्याचेही तिने म्हटले आहे. मात्र, मुंबईचे पोलीस आयुक्त तिच्या तक्रारीला दाद देत नाहीत. त्या महिलेवर प्रचंड दबाव आहे. त्यामुळे याप्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करावी, असे त्या म्हणाल्या.
मनिषा कायंदेंच्या या मागणीनंतर विधानपरिषेदच्या सभापती निलम गोऱ्हे यांनीही राहुल शेवळेंच्या एसआटी चौकशीचे निर्देश दिले