खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी
आपला आवाज न्यूज नेटवर्क
०९ नोव्हेंबर २०२२
शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत ईडीच्या (ED) कोठडीत आहेत. या प्रकरणी त्यांना जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार असून राऊत यांना दिलासा मिळेल की पुन्हा त्यांची रवानगी तुरुंगात होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहे. या प्रकरणी त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे.