भोरवाडी येथे महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन

ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके : 
दि.२१ जानेवारी २०२३ (ओझर)

नुकताच जुन्नर तालुक्यातील ओतूर – पिंपरी पेंढार प्रभागातील ग्रामपंचायत भोरवाडी येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती ( उमेद) अभियान – पंचायत समिती जुन्नर आणि बिरदेव महिला ग्राम संघ यांचे सहकार्याने महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. गौरी ताई बेनके उपस्थित होत्या. यावेळी सर्व ग्राम संघाच्या महिलांच्या संकल्पनेतून विधवा महिलांचे हळदी कुंकू आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पंचायत समिती जुन्नर चे प्रभाग समन्वयक रविंद्र आल्हाट सर , प्रभाग समन्वयक निर्मला गाढवे , सीमा पडवळ, शालिनी, बेनके,विघ्नहर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त/ शिवसृष्टी प्रभाग संघाच्या सचिव राजश्री कवडे, ओझर २ च्या प्रेरिका (CRP) मनीषा जगताप, उपस्थित होत्या.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिता पडवळ यांनी केले तर स्वागत आरती भोर यांनी केले .यावेळी सुष्मा भोर, सविता मोजाड, मंदा भोर , वर्षा भोर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले .तसेच यावेळी ग्राम संघाच्या अध्यक्षा मंदा भोर , सचिव मीरा भोर, कोषाध्यक्ष सुशीला हांडे आणि ग्राम संघातील सर्व महिला यावेळी उपस्थित होत्या. तर यावेळी पंचायत समिती जुन्नर उमेद अभियान अंतर्गत प्रभाग समन्वयक रविंद्र आल्हाट सर यांचे माध्यमातून भोरवाडी गावात एकूण ९ समुहांची स्थापना करण्यात आली आहे. या सर्व समूहाचे कामकाज दश सुत्री प्रमाणे चालते. या कार्यक्रमांमध्ये एकूण 110 महिलांनी आपला सहभाग नोंदवला . या कार्यक्रमाची सांगता सर्व महिलांना अल्पोपहार देऊन करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *