चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची उद्योजकांकडून दुरुस्तीची मागणी

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०७ नोव्हेंबर २०२२


चाकण औद्योगिक भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाल्याने परिसरातील कारखानदार आणि वाहतूकदार अतिशय त्रस्त झाले आहेत. याचा दैनंदिन औद्योगिक स्थितीवर विपरीत परिणाम होत असल्यामुळे तातडीने या भागातील महामार्गाची कामे मार्गी लावण्याची मागणी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित विभागाच्या प्रशासनाला देण्यात आले आहे. येथील मर्सिडीज बेंज, ह्युंडाई, फोक्सवॅगन अशा अनेक बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मागील १५ ते २० वर्षांत झालेल्या गुंतवणुकीने देशातील वाहन उद्योगाचे अव्वल केंद्र बनण्याची क्षमता चाकणमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. थेट अमेरिकेशी स्पर्धा करणाऱ्या महाराष्ट्राचे ‘डेट्रॉईट’ म्हणून उभे राहू पाहणाऱ्या चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची अवस्था मात्र अत्यंत दयनीय झाली आहे. या मार्गांची कामे त्वरित करावी, यासाठी निवेदन देण्यात आल्याचे संघटनेचे सचिव दिलीप बटवाल यांनी सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *