पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेचा प्रारूप आराखडा अखेर जाहीर; निवडणुकीचे बिगुल वाजले

रोहित खर्गे
विभागीय संपादक

०१ फेब्रुवारी २०२२

पिंपरी 


Pimpri-Chinchwad Election Ward Map
पिंपरी-चिंचवड निवडणूक वॉर्ड नकाशा

पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेचा प्रारूप आराखडा आज मंगळवार दि. ०१ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला आहे. कित्येक दिवस चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय असणारी प्रभाग रचना आज नागरिकांसाठी महानगरपालिकेच्या पार्किंग जागेत खुली करण्यात आली. सुधारित प्रभाग रचना, त्याचे नकाशे आणि माहिती तेथे सर्व बाजूने आच्छादलेल्या टेंट मध्ये फलकावर लावण्यात आली आहे. हि माहिती पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पालिकेच्या अ, ब, क, ड, आणि पुढे ०८ प्रभागातील आवारात नागरिकांसाठी लावलेली आहे.

तळवडे येथून प्रभागाला सुरवात झाली असून शेवटचा प्रभाग महापौर माई ढोरे यांचा जुनी सांगवी, मधूबन सोसायटी असा असणार आहे. भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा प्रभाग क्रमांक ०५ चऱ्होली असणार आहे. तर सर्वात छोटा प्रभाग क्रमांक ७ सखूभाई गबाजी गवळी उद्यान भोसरी असणार आहे. आयोगाच्या सूचनेनुसार तळवडे हा पहिला प्रभाग असणार आहे. तर शेवटचा प्रभाग महापौर विद्यमान महापौर माई ढोरे यांचा जुनी सांगवी असणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे एकूण ४६ प्रभाग असून १३९ नगरसेवक असणार आहे. सर्वात मोठा प्रभाग क्रमांक ०१ रूपीनगर तळवडे असून त्याची लोकसंख्या ४६,९७९ आहे. तर लोकसंख्येने सर्वात छोटा प्रभाग क्रमांक ३७ वाकड हा असणार आहे.

सदर आराखडा तयार करताना शहरातील रस्ते, नाले, भौगोलिक भाग, रेल्वे आणि शहराच्या सर्व सीमा यांचा विचार करूनच हा आराखडा तयार केला असल्याचे निवडणूक अधिकारी बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.

आजपासून १४ फेब्रुवारी पर्यंत ज्या कुणाला काही हरकती असतील तर लेखी स्वरूपात नोंदवण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यानंतर या हरकती निवडणूक आयोगाकडे पाठवल्या जाणार आहेत.

या प्रारूप आराखाडयाबाबत सर्वच पक्षामधील काही नगरसेवक आणि काही इच्छूक उमेदवारांमध्ये ‘ कही खुशी, कही गम ‘ असे चित्र असल्याने नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. काही विद्यमान नगरसेवकांचेही प्रभाग उलटे – पालटे झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्याने शहरात पुन्हा प्रचार आणि सार्वजनिक कार्यक्रमांना उधाण येईल एवढं मात्र नक्की.

Citizens getting information about election wards
निवडणुक वॉर्ड्स ची माहिती घेत नागरिक

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *