रिक्षाचालक कष्टकरी जनतेने प्रस्थापितांना निवडणुकीत धडा शिकवावा – बाबा कांबळे

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०१ फेब्रुवारी २०२२

पिंपरी


पिंपरी चिंचवड, पुणे शहरात बेकायदेशीर टुव्हीलर बाईक रॅपिडो सुरू आहे. रिक्षाचे हप्ते थकल्यामुळे रिक्षा ओढून घेऊन जात आहे. बजाज फायनान्स आणि इतर फायनान्स कंपन्या गुंडगिरी करत रिक्षा ओडून नेत आहेत. केंद्र शासनाने वाहतूकीसाठी नवीन नियमावली करून दंडाच्या रक्कमा वाढवल्या आहेत. रिक्षाचालकांना सामाजिक सुरक्षा देखील मिळत नाही. कल्याणकारी मंडळाची घोषणा केली प्रत्यक्ष अंमलबजावणी केली नाही. रिक्षाचालकाच्या प्रश्नासाठी संघटनेच्या वतीने अनेक वेळा रस्त्यावर उतरून आंदोलन मोर्चा काढले. परंतु दखल घेतली जात नाही. आता मोर्चा न काढता राजकीय पक्षांना धडा शिकवणे हाच एक कलमी कार्यक्रम येणाऱ्या 2022 महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लावला पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिला.

रिक्षा चालकांच्या प्रश्नावर साने चौक येथे बैठक घेण्यात आली. या वेळी विविध मागण्यांचा ठराव करून सह्यांच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या वेळी बाबा कांबळे बोलत होते.या वेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत शहर कार्याध्यक्ष लक्ष्मण शेलार, अण्णा जोगदंड ,रवींद्र लंके, सुरज सोनवणे, योगेश जाधव, जीवन गलिदे, अमोल आल्हाट आदी उपस्थित होते.

साने चौक येथे रिक्षाचालकांची सह्यांची मोहिम सुरू; विविध मागण्यांचा केला ठराव

बाबा कांबळे म्हणाले की, आपले प्रश्न सुटतील यासाठी तयारीला लागा. प्रस्थापित पक्षांना धडा शिकवण्यासाठी प्रत्येक प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करा. प्रत्येक वॉर्डांमध्ये आपल्या लोकांच्या याद्या तयार करा. आपल्या विचारांचे माणस तयार करा. तरच आपल्याला न्याय मिळेल. आपली किंमत राजकीय पक्षांना कळणार नाही. आपले प्रश्न सोडवण्यासाठी आगामी निवडणुकीत प्रस्थापितांना धडा शिकवा असे आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिला.

पिंपरी चिंचवड शहरात बेकायदेशीर टुव्हीलर बाईक रॅपिडो सुरू आहे. ती बंद झालीच पाहिजे. रिक्षा चालक आपला व्यवसाय इमाने इतबार करतात. मात्र सध्या कोरोनामुळे रिक्षा चालकांच्या व्यवसायाला मोठा फटका बसला. त्यामुळे अनेकांचे हफ्ते रखडले आहेत. रिक्षा चालक, मालकांचे थकित हप्ते माफ झालेच पाहिजे. शेतकऱ्यांच्या धरतीवर आरसीबुक कोरे होणे गरजेचे आहे. फायनान्स कंपन्या जबरदस्तीने वसुली करत आहेत. त्यांच्याकडून अन्याय सुरू आहे. बेकायदेशीर हप्ते वसुली करणाऱ्या बजाजसह सर्व फायनान्स कंपनींच्या गुंडावर कारवाई करावी. या मागण्यांसाठी रिक्षा चालक, मालक व नागरीक प्रवाशांच्या वतीने सह्यांची मोहिम सुरु केली आहे. या मागण्यांचा विचार न केल्यास आगामी काळात मोठा लढा उभारून प्रस्थापितांना धडा शिकवू असा इशारा बाबा कांबळे यांनी दिला. कार्यक्रमाच्या संयोजना साठी नारायण जाधव, रमेश पवार, धनंजय पवार, लहु डुकळे, दिपक पिटेकर बाळु सुकळे, हिरामण दगडे, आण्णा जोगदंड, बापु पवार, विलास डुकळे, विजय क्षिरसाठ यांनी परिश्रम घेतले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *