शरद पवार यांची कोरोना मुक्तीवर यशस्वी मात

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१ फेब्रुवारी २०२२

मुंबई


समय बलवान है…योद्धा ये महान है ।

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. या निमित्ताने पवार साहेबांच्या ८१ व्या वाढदिवशी, पुण्यातील प्रभारंग फिल्म्स् ने तयार केलेले गाणे राष्ट्रवादी काँग्रेस ने सोशल मीडियावर लाँच केले आहे.

राष्ट्रवादीकडून पवार यांच्यावरील गौरवगीत सोशल मीडियावर लाँच

शरद पवार यांनी २४ जानेवारी रोजी ट्विट करुन आपल्याला करोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर शरद पवार यांच्यावर मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी होम क्वारंटाईनमध्ये उपचार सुरु होते. आज त्यांनी कोरोनामुक्त झाल्याची माहिती दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ८१ वर्षांच्या या अजिंक्य योद्ध्याने कोरोनावरदेखील यशस्वी मात केल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.

शरद पवार यांच्या याच जिद्दीचे वर्णन करणारे “समय ये बलवान है.. योद्धा ये महान है.. हर अर्जुन का सारथी ये इसकी पहचान हैं।” हे गौरवगीत प्रभारंग फिल्म्स् ने तयार केले आहे. १२ डिसेंबर २०२१ रोजी नेहरू सेंटर येथे कार्यक्रमात हे गीत प्रदर्शित करण्यात आले होते. त्या वेळी या गीताला मान्यवरांनी पसंती दिली. त्यामुळे चाहत्यांच्या आग्रहास्तव राष्ट्रवादी काँग्रेस ने आज हे गीत सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाँच केले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *