निगडी | रामनवमी निमित्त श्री साईबाबा मंदिर निगडी प्राधिकरण मध्ये विविध कार्यक्रम..

रामनवमी निमित्त श्री साईबाबा मंदिर निगडी प्राधिकरण मध्ये विविध कार्यक्रम
ॐ श्री साई सेवा प्रतिष्ठान निगडी प्राधिकरण आयोजित


दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते रामनवमीच्या दिवशी. सकाळी 6:00 वाजता श्री साईबाबा मूर्तीस अभिषेक,
सकाळी 6:30 वाजता श्री ची आरती करण्यात आली, दुपारी 12:00 वाजता श्रीराम जन्म सोहळा करण्यात आला, सायं 6:00 वाजता श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम करण्यात आला, सायं 7:00 वाजता श्री सिद्धिविनायक गांगेश्वर महाराज भजनी मंडळाचा कार्यक्रम करण्यात आला, सायं 7 :00 महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम चालू करण्यात आला,

रात्री 8:00 वाजता श्री साईबाबांची मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित होते. शैलजाताई मोरे, माजी उपमहापौर. पल्लवीताई पांढरे, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी विधानसभा. सचिन चिखले, शहराध्यक्ष मनसे. अश्विनीताई चिखले मा नगरसेविका. शैलाताई पाचपुते, जिल्हाध्यक्षा शिवसेना. विजय शिनकर, चिंचवड आकुर्डी मंडल अध्यक्ष. महावीर चोपडा, चेअरमन सत्यम ज्वेलर्स. तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहिलेले व अन्नदानासाठी सहकार्य केलेल्या सर्व मान्यवरांचा प्रतिष्ठानच्या वतीने शाल शिरफळ देऊन सन्मान करण्यात आला.आरतीला, व महाप्रसाद घेण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *