श्री बेल्हेश्वरच्या विद्यार्थ्यांची भरली ३८ वर्षांनी शाळा

रामदास सांगळे
विभागीय संपादक
१९ ऑगस्ट २०२२

बेल्हे


रयत शिक्षण संस्थेच्या श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर बेल्हे (ता.जुन्नर) येथील विद्यालयातील सन १९८६ च्या पुर्वीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आणि गुरुजनांचा आदरपूर्वक सन्मान सोहळा व स्नेहमेळावा गुरूवार (दि.१८) रोजी आळंदी येथे संपन्न झाला.या निमित्ताने मित्रा पुन्हा एकदा शाळेत ३८ ते ४२ वर्षानी काही शिक्षक आणि विद्यार्थी यांची शाळा भरली. या वेळी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्साह गगणात मावत नव्हता. सर्व गुरुजन एकमेकांना भेटण्यासाठी आतुर झाले होते. त्यामुळे अनेक दिवसांपासून दिवस निश्चित करण्याचे प्रयत्न चालू होते. कार्यक्रमाची सुरुवात गणेश पुजन व राष्ट्गीताने केली. सर्व गुरुजन यांनी आपल्या शाळेतील आणि गावाबद्दल जुन्या आठवणी यांना उजाळा दिला.

गुरुजनांचा शाल, पुष्पगुच्छ, ज्ञानेश्वरी , सन्मानफ्रेम (भक्ती शक्ति) व एक व्रुक्ष रोपटे देऊन सन्मान केला. तदनंतर सर्व गुरुजनांचे विचार ऐकले सर्व गुरुजनांनी त्याच उत्साहात आजही आपणास केंव्हाही काहीही अडचण असेल तर ज्ञानदान किंवा शैक्षणिक विभागात किंवा अन्य क्षेत्रात नक्कीच मदत करु हा विश्वास दिला व अशाच स्वरूपात गुरुजणांनी ज्ञानदान कार्य आजही पुढेही चालू राहील हा मानस व्यक्त केला. काही माजी विद्यार्थी यांनीही आपल्या आठवणींना उजाळा देताना आपण शिकक्षामुळे कसे घडलो आणि आत्ता आईवडील व गुरुजण यांच्या शिकवणी मुळे आम्ही कसे घडलो? कसे वाढलो? आज आम्ही जे काही आहोत ते प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात उत्तम प्रकारे कार्यरत आहोत.

 

किसान, शेतकरी,व्यापार, उद्योग, व्यवसाय ते उच्चपदस्थ पदावर कार्यरत आहोत. हे सांगताना काहिंचा ऊर भरून आला तर काहिंच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या सर्व माजी शालेय सहकारी मित्रांनी एकमेकांना शेती नौकरी व्यवसाय किंवा शैक्षणिक मार्गदर्शन व एकमेकांना मदत करण्याचे अश्वासन दिले. एकमेकांशी खुप दिवसांनी मुक्त संवाद केला. पुर्ण दिवस हा शालेय जिवणाच्या गप्पाष्टकात जुन्या नवीन गोष्टिंना उजाळा देत कसा गेला कळाले नाही सर्व गुरुजन व सर्व शालेय सहकारी मित्र मैत्रिणी यांनी पुन्हा एकदा लवकरात लवकर भेटण्याचा माणस व्यक्त करून स्नेहमेळावा संपन्न झाला. सर्वांचे आभार मानून पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.सर्वांना एकत्रित करण्याचे काम व कार्यक्रमाचे आयोजन प्रकाश पानसरे, रखमाजी मटाले, शांताराम भालेराव, प्रकाश खोमणे, शिवाजी सैद, भगवान गावडे, ठकसेन शिंदे,बबन गुंजाळ, बाळकृष्ण जुंदरे, विजय गाडेकर यांनी केले.

 


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *