राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१२ नोव्हेंबर २०२२


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जामीन मिळणार की तुरुंगात जावं लागणार यावर आज (१२ नोव्हेंबर) न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

विवियाना मॉलमध्येहर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडताना प्रेक्षकाला केलेल्या मारहाणीविरुद्ध जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर राज्यातील राजकारण पुन्हा तापलंय. जितेंद्र आव्हाड यांच्यासह अकरा जणांना आज कोर्टात हजर करणार आलं. जितेंद्र आव्हाड यांच्यावर एकूण सात कलमं वर्तक नगर पोलिसांनी मारहाणीच्या आरोपाखाली लावली आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *