राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी थोरांदळे येथील उत्कृष्ट महिला क्रिकेटर श्रद्धा पोखरकर हिचे सोशल मीडियाद्वारे केले कौतुक

राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी थोरांदळे येथील उत्कृष्ट महिला क्रिकेटर श्रद्धा पोखरकर हिचे सोशल मीडियाद्वारे केले कौतुक
आंबेगाव : –
मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ

महिला प्रीमियर क्रिकेट लीग 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या टिममध्ये क्रिकेट खेळणारी थोरांदळे गावची कन्या श्रद्धा पोखरकर हीचे देखील महत्त्वपूर्ण योगदान असल्याने राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी सोशल मिडियाद्वारे श्रद्धा ला शुभेच्छा देत कौतुकाची थाप दिली आहे.

काल,दिल्ली येथे अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या महिला प्रीमिअर क्रिकेट लीग (WPL 2024) या स्पर्धेचा अंतिम सामना हा दिल्ली कैपिटल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (DC vs RCB) यांच्यात झाला.या अंतिम व अटितटीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाने उत्तंम कामगिरी करत कॅप्टन स्म्रीती मंदाना यांच्या नेतृत्वाखालील पहिल्यांदच विजेतेपद पटकावले आहे.
या संघाच्या विजयामध्ये आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील शेतकरी कुटुंबातील श्रद्धा पोखरकर हीचे देखील महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.या स्पर्धेसाठी झालेली तिची निवड तिने सार्थ ठरविली असून,यासाठी तिचे मनःपूर्वक अभिनंदन.भारतीय महिला क्रिकेट संघात खेळण्याचे तिचे स्वप्न असून,तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *