उच्च विद्याविभूषित तरुण नेतृत्व, निष्ठावंत युवा नेते ॲड. मोरेश्वर शेडगे यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीवर नियुक्ती..

उच्च विद्याविभूषित तरुण नेतृत्व, निष्ठावंत युवा नेते ॲड. मोरेश्वर शेडगे यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीवर नियुक्ती

शहरात पक्ष संघटनेला तरुणाईची ताकद मिळणार

मुंबई : गेली अनेक वर्षे पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीसाठी प्रामाणिकपणे काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे ॲड. मोरेश्वर शेडगे यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणीवर आज नियुक्ती करण्यात आली. PCMC भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोरेश्वर शेडगे यांना प्रदेश कार्यकारिणीवर नियुक्त करण्यात आल्याचे पत्र आज सुपूर्द केले. PCMC ॲड. मोरेश्वर शेडगे हे गेली अनेक वर्षे पिंपरी चिंचवड शहरात पक्ष हितासाठी व पक्षाच्या बांधणीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. अनेकदा त्यांना संधी असतानाही केवळ पक्ष हितासाठी म्हणून त्यांनी अनेक व्यक्तिगत त्याग केले आहेत म्हणून अहोरात्र प्रयत्नशील असणारे मोरेश्वर शेडगे यांना प्रदेश कार्यकारणीवर घेऊन भारतीय जनता पार्टीने त्यांना मोठी संधी दिली आहे.

थोडक्यात परीचय

१९८० च्या दशका पासून पिंपरी चिंचवड शहराला कामगार चळवळीचा वारसा आहे, त्यांचे वडील ज्ञानेश्वर शेडगे टाटा मोटर्स कंपनीत कामगार संघटनेचे अध्यक्ष होते, तीर्थक्षेत्र मोरया गोसावी देवस्थानचा संस्कृतिक वारसा आणि विद्यार्थी युवक संघटनेच्या माध्यमातून ऍड.मोरेश्वर शेडगे यांनी सर्वात मोठा दहीहंडी उत्सव चिंचवड मध्ये साजरा केला होता. शहरातील विविध सामाजिक, सेवाभावी, शैक्षणिक संस्था मध्ये त्यांचा दांडगा लोकसंपर्क आहे. अँड. मोरेश्वर शेडगे विधी पदवीधर असूनही त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी पूर्णवेळ आयुष्य झोकून दिले आहे. त्यांच्या प्रदेश कार्यकारिणी नियुक्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महविद्यालयीन जीवनापासून पूर्णवेळ कार्यकर्ता
भारतीय जनता पक्षाच्या स्थापने पासून मोरेश्वर शेडगे यांचे वडील ज्ञानेश्वर शेडगे व चुलते शिवाजी शेडगे हे पक्ष संघटनेचे कार्य करीत आहेत. ॲड. मोरेश्वर शेडगे हे बालपणा पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून संघदृष्ट्या प्रथम वर्ष शिक्षित आहेत. महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेचे 5 वर्षे सक्रिय कार्य केले आहे.

ॲड. मोरेश्वर शेडगे हे २००२ पासून म्हणजे गेल्या २१ वर्षांपासून पक्षाचे पूर्णवेळ सक्रिय काम करत आहेत. २००२ मधे भाजप युवा मोर्चा प्रभाग अध्यक्ष, २००३ मधे भाजप युवा मोर्चा मंडल अध्यक्ष, २००६ मधे भाजप युवा मोर्चा पिंपरी चिंचवड संघठन सरचिटणीस, २००९ मधे विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष, २०११ भाजयुमो प्रदेश सचिव, २०१३ मधे भाजयुमो पिंपरी चिंचवड जिल्हाध्यक्ष व २०२० मधे भाजपा पिं.चि. जिल्हा महामंत्री या क्रमाने पक्षाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. यात विशेष बाब म्हणजे ॲड.मोरेश्वर शेडगे भाजपा युवा मोर्चाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष असतांना त्यांनी केंद्र सरकार, राज्य सरकार व महापालिकेतील भ्रष्टाचारा विरोधात केलेली आंदोलने प्रचंड गाजली आहेत.

लोकसभा, विधानसभा व महानगरपालिका निवडणूका असो किंवा पुणे विद्यापीठ सिनेट निवडणूका असो या सर्व निवडणूकांमधे पक्षाच्या अनेक महत्वाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या ॲड.मोरेश्वर शेडगे यांनी अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडल्या आहेत. २०१४ मधे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधना नंतर विधानसभा निवडणुंका आधी लोकनेत्या पंकजा मुंडे यांनी काढलेल्या ‘पुन्हा एकदा संघर्ष यात्रेत ॲड. मोरेश्वर शेडगे पुर्णवेळ सहभागी होते व त्यावेळी त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली होती.

२०१९ मधे तात्कलीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत पुर्णवेळ सहभाग घेऊन अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूकीत त्यांनी प्रचार यंत्रणेत बूथ व्यवस्थापनात उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यामुळे प्रदेश नेतृत्वाने व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ॲड.मोरेश्वर शेडगे हे पक्षाचे जुने व निष्ठावंत कार्यकर्ते असल्याची दखल घेत त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक केले.

नगरसेवक झाल्या नंतरही पक्षाच्या २०१७ ते २०१९ दरम्यान विस्तारक योजनेत ॲड.मोरेश्वर शेडगे यांनी पक्षकार्यात स्वःताला झोकून देत दोन वर्षे विस्तारक म्हणून मुळशी, भोसरी व चिंचवड या विधानसभांमधे वेगवेगळ्या टप्प्यांमधे काम केले आहे. ॲड.मोरेश्वर शेडगे यांच्या या नव्या नियुक्तीमुळे पक्षाच्या जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांमधे आनंदाचे वातावरण झाले आहे तसेच या नियुक्तीमुळे आगामी लोकसभा निवडणुकीत व विधानसभा निवडणुकीत पक्षाला निश्चितच चांगला फायदा होईल असा विश्वास पक्ष वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *