महिला दिनाच्या पुर्व संध्येला ‘आपला आवाज आपली सखी’ च्या सभासदांचा बाईक रॅली काढून जल्लोष

आपला आवाज आपली सखी आणि कलर्स मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य बाईक रॅली व होम मिनिस्टर खेळ रंगला वहिनींचा या कार्यक्रमाचे आयोजन

8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आपला आवाज आपली सखी च्या वतीने दरवर्षी महिलांसाठी बाईक रॅली आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. याचाच एक भाग म्हणून ह्या वर्षीचा महिला दिन कलर्स मराठी च्या कलाकारांसोबत बाईक रॅली आणि होम मिनिस्टर खेळ रंगला वहिनींचा कार्यक्रमाने करून करण्यात आला.
आपला आवाज न्यूज नेटवर्क च्या कार्यालयापासून ते चाफेकर चौक चिंचवड आणि नंतर रामकृष्ण मोरे सभागृह अशी भव्य बाईक रॅली आपला आवाज आपली सखी च्या संचालिका संगीता तरडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली.या बाईक रॅली मध्ये कलर्स मराठी च्या कलाकार निवेदिता सराफ, तन्वी मुडंले पुजा पवार साळुंखे, कश्मिरा कुलकर्णी व बाल कलाकार सांची भोईर यांचे प्रमुख आकर्षण होते.सोबतच दोन आलिशान व्हेंटीज कार जिप्सी आणि विविध वेशभूषा करून सहभागी झालेल्या सखी हे या बाईक रॅलीचे वैशिष्ट्ये होते.या भव्य बाईक रॅलीला पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी झेंडा दाखवत उद्घाटन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी आपला आवाज न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक व डोक्यावर फेटे बांधून हजारो आपला आवाज आपली सखी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते…

बाईक रॅली मध्ये सखी सभासदांनी आपला आवाज आपली सखी आणि महिला दिनाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला..याच सोबत कलर्स मराठी च्या कलाकारांबरोबर सखी सभासदांनी सेल्फी आणि फोटो चा आनंद ही लुटला.या बाईक रॅलीची सांगता शहरातील रामकृष्ण मोरे सभागृह येथे करण्यात आली.या सभागृहात आपला आवाज आपली सखी च्या आम्ही उद्योजिका या फोरम च्या महिलांनी आपल्या व्यवसायाचे स्टॉल लावले होते. याचे उद्घाटन कलर्स मराठी च्या अभिनेत्री आणि आपला आवाज आपली सखी च्या संचालिका संगीता तरडे यांच्या हस्ते करण्यात आले.या नंतर दिपप्रज्वलन करून मान्यवरांचा सत्कार करून बाळकृष्ण नेरकर प्रस्तुत खेळ रंगला वहिनींचा या कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली यात अनेक महिलांनी विविध बक्षीस जिंकत सहभाग घेतला. होम मिनिस्टर खेळ रंगला वहिनींचा यांच्या पहिल्या विजेत्या

 

श्रुती देसाई या झाल्या त्यांना पैठणी व सोन्याची नथ देवुन गौरवण्यात आले. तसेच रुपाली भोसले,सारिका देशमुख,पूजा घोडके,पूजा गरड व नेहा बुराडे यांना द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.या कार्यक्रमासाठी पैठणीचे सहकार्य गायत्री पैठणी यांचे लाभले तर नथीचे सहकार्य बाफना ज्वेलर्स यांचे लाभले.या नंतर उद्योजिका गौरी मिर्लेकर, रश्मी पावले, तृप्ती राख, मंगल ठाकूर,भाग्यश्री पवार, आरती शिंदे, अर्चना देशपांडे, प्राजक्ता चव्हाण, कविता वीर अक्षता मोहिते, रश्मी बाफना, डॉक्टर सोनाली तांबे व डॉक्टर सोनिया महामुनी यांना उपस्थित कलाकारांच्या हस्ते आम्ही उद्योजिका आचिवर्स अवाँर्ड 2024 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *