आई तुळजा भवानीच्या पलंगाचे दर्शन घेत कुमशेत गावचे सरपंच व ग्रामस्थांनी देवीच्या पलंगाच्या पुढील प्रवासास दिल्या शुभेच्छा

मंगेश शेळके
बातमी प्रतिनिधी
११ ऑक्टोबर २०२१

ओझर

सालाबादप्रमाणे कुमशेत गावामध्ये भाद्रपद प्रतिपदेला असणाऱ्या आई तुळजा भवानीच्या पालखीचे ( पलंग) आगमन असते, पण गेले दोन वर्षे झाले तरी कोरोना महामारीच्या रोगामुळे कुमशेत गावामध्ये पलंग पालखी चे आगमन झाले नाही. तरी कुमशेत गावचे दैवत असणाऱ्या आई तुळजा भवानीच्या पलंग पालखी दर्शनासाठी ग्रामस्थ व महिला भगिनींना अहमदनगर येथील पलंग पालखीचे पुजारी व आमचे मित्र गणेश पलंगे यांच्या सहकार्याने समाज मंदिरामध्ये देवीचा पलंग दर्शनासाठी ठेवण्यात आला. व सर्व ग्रामस्थांनी दर्शनाचा लाभ घेत , आनंद व्यक्त करत पुजारी गणेश पलंगे यांचे आभार मानले. कुमशेत गावचे नवनिर्वाचित सरपंच रविंद्र डोके व त्यांच्या सुविद्य पत्नी रेश्माताई डोके यांनी आई भवानी मातेचा प्रसाद व आशीर्वाद घेऊन आई देवीच्या पलंगाच्या पुढील प्रवासास शुभेच्छा दिल्या. यावेळी समवेत कुमशेत ग्रामपंचायत सदस्या निर्मला डोके ,गणेश डोके ,हनुमान देवस्थानचे अध्यक्ष मधुकर विष्णु डोके ,सुभाष पंढरीनाथ डोके ,गौरव डोके ,सुरेश डोके ,देविदास डोके ,मनोज डोके ,शंकर भगत ,विश्वनाथ डोके पाटील ,महेश डोके ,संभाजी डोके ,पांडुरंग डोके, अनिल डोके ,रोहित डोके ,वैभव डोके, रोहित जाधव व सर्व महिला वर्ग उपस्थित होत्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *