एसबीपीआयएम आयोजित ‘युवोत्सव २०२४’ क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील एसबीपीआयएम महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘युवोत्सव २०२४’ क्रीडा स्पर्धांचे गुरुवारी (दि.१५) विविध महाविद्यालयीन खेळाडूंच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात उद्घाटन झाले. या स्पर्धेमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड आणि सातारा येथील हॉलीबॉल २४ संघ, फुटबॉल ३० आणि क्रिकेट ३२ संघांनी सहभाग घेतला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभाग प्रमुख मिनीनाथ दंडवते यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सकाळ माध्यम समूहाचे मनुष्यबळ अधिकारी विनोद बिडवाईक आणि व्यवस्थापक श्यामसुंदर मादेवार, एसबीपीआयएम च्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर आदींसह स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या महाविद्यालयातील खेळाडू उपस्थित होते.
गुरुवारी झालेल्या हॉलीबॉल च्या उपांत्य फेरीतील सामन्यामध्ये एमआयटी महाविद्यालयाने पी. एस. मॉडर्न महाविद्यालयाचा २५ विरुद्ध २० अशा गुणांनी पराभव केला.
क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रतिभा महाविद्यालयावर पुणे बिजनेस स्कूलच्या संघाने एक रन ने विजय मिळवला.


फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंदिरा इन्स्टिट्यूट एमबीए संघाने पीसीसीओईच्या संघावर दोन गोलच्या फरकाने विजय मिळवला.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत डॉ. अमरीश कुमार कवीया आणि डॉ. काजल माहेश्वरी आणि विद्यार्थी प्रतिनिधी मयूर मराठे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *