नाशिक पदवीधर निवडणूक! शुभांगी पाटील विरूध्द सत्यजित तांबे सामना रंगणार ?

दि. १४/०१/२०२३

नाशिक

 

नाशिक  : काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी ऐनवेळी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे महाविकास आघाडी कुणाला पाठिंबा देणार, यावरून आज सकाळपासून राजकीय खलबतं सुरू होती. आज अखेर ठाकरे गटाने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

मात्र महाविकास आघाडी शिवसेना समर्थित उमेदवाराला पाठिंबा देणार की नाही? की निवडणुकांवरून महाविकास आघाडीत बिघाडी होईल, याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र सध्या तरी नाशिकची जागा ठाकरे गट लढवणार असून शुभांगी पाटील यांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीच्या पाठिंब्याची घोषणाही लवकरच होण्याची शक्यता आहे.शुभांगी पाटील या धुळे येथील भास्कराचार्य संशोधन संस्थेत त्या शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या संस्थापक आणि राज्याच्या अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशनच्या संस्थापकदेखील आहेत. जळगावमधील गोपाळ बहुउद्देशीय संस्थेच्या त्या अध्यक्षा आहेत.नाशिक पदवीधर मतदार संघात शुभांगी पाटील यांचा सत्यजित तांबे यांच्याविरोधात सामना रंगणार आहे.

सत्यजित तांबे यांना भाजपाचा पाठिंबा मिळणार असल्याची दाट शक्यता आहे. भाजपच्या वतीने अद्याप स्पष्ट वक्तव्य आलेलं नसलं तरीही फडणवीस यांनी यासंदर्भात सूचक वक्तव्य केलंय. त्यामुळे सत्यजित तांबे हे भाजप समर्थित उमेदवार असतील हे निश्चित आहे.तर अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांच्या पाठीशी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्रित उभे राहणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *