कोरोना लसीकरणास नळवणे गावात उदंड प्रतिसाद । एका दिवसात १७० नागरिकांना लसीकरण…

विभागीय संपादक रामदास सांगळे

बेल्हे:- प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्हे यांच्या वतीने रविवार (दि.११) नळवणे (ता.जुन्नर) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र या ठिकाणी कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यामध्ये गावातील सुमारे १७० नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एस. बी.थोरात व गावचे माजी सरपंच तुषार देशमुख यांनी दिली.


सकाळी ११ वाजता डॉ. थोरात व त्यांच्या सर्व कर्मचारी वर्गाने लसीकरनासा सुरवात केली.त्यांना नळवणे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग गगे, ग्रामपंचायत सदस्य तृप्ती देशमुख ,माजी पोलीस पाटील शंकर कोंडीबा शिंदे,ग्रामपंचायत कर्मचारी भागा शेंगाळ,पांडू फावडे तसेच स्थानिक ग्रामस्थ हौशीराम शिंदे, शुभम उबाळे, चंद्रकांत शिंदे, रामकृष्ण शिंदे, नवनाथ गगे, युवराज शिंदे,बाबू शिंदे यांनी मोलाचे सहकार्य केले.
लसीकरणा पासून वंचित राहिलेल्या नागरिकांसाठी लवकरच पुन्हा एकदा या कॅम्प चे आयोजन करणार असल्याचे माजी सरपंच तुषारभाऊ देशमुख यांनी माहिती दिली.