रामलल्ला प्राण प्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे महाळुंगे पडवळ येथे श्रमदान..

रामलल्ला प्राण प्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे महाळुंगे पडवळ येथे श्रमदान

नारायणगाव : – (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कृषि व्यवस्थापन महाविद्यालयाचे विशेष हिवाळी शिबिर महाळुंगे पडवळ येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरांतर्गत स्वच्छता अभियान , पथनाट्य , शेतकरी मार्गदर्गन , चर्चासत्र , व्याख्यानमाला, सामाजिक चित्रपट व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
दरम्यान श्रीक्षेत्र आयोध्या येथील श्री रामलल्ला प्राण प्रतिष्ठापनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय स्वयंसेवक सेवा योजना व ग्रामस्थ यांनी संपूर्ण शाळा परिसर , राममंदिर व गावातील इतर परिसराची स्वच्छता केली. या श्रमदानासाठी सरपंच सुजाता चासकर व उपसरपंच विकास पडवळ व इतर ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. अशी महिती रासेयो प्रमुख परमेश्वर बनसोडे व प्रो. निकिता गोरडे यांनी दिली . या उक्रमात प्राध्यापक लोळगे , काशिद, पवार , खरमाळे , चव्हाण , जाधव यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *