यशस्वी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये “एक दिवस शाळेसाठी” या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन..

यशस्वी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये “एक दिवस शाळेसाठी” या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

पिंपरी-चिंचवड
दि.18/01/2024

यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, यशस्वी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आज दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी वाहतूक शाखा पिंपरी चिंचवड च्या माध्यमातून “एक दिवस शाळेसाठी “या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमा अंतर्गत आशालता भोसले सहायक पोलीस उपनिरीक्षक,वाहतूक शाखा पिंपरी चिंचवड यांनी सर्व विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम व महिला आणि मुलींचा सन्मान ,सायबर गुन्हेगारी, सोशल मीडिया ,व्यसनाधीते पासून दूर राहण्याबाबत सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून सदर उपक्रमाची व सदर विषयासंदर्भात माहिती सांगण्यात आले.यावेळी दिनेश लोखंडे पोलीस हवालदार वाहतूक शाखा पिंपरी चिंचवड हे कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.


विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देवकाते सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर व्याख्यानाचे विद्यालयात आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभा देवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयामध्ये कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. सदर व्याख्यानाचा लाभ हा विद्यालयातील इयत्ता सहावी ते दहावीच्या साडेतीनशे विद्यार्थ्यांनी घेतला. विद्यार्थी व शिक्षक यांच्या उपस्थितीमध्ये व्याख्यान आनंदात संपन्न झाले . कार्यक्रमाची सांगताही पसायदानाने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *