मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र..

रोहित खर्गे
विभागीय संपादक

मुंबई :- दि १४ एप्रिल २०२१
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लसींचा निर्माण झालेला तुटवडा याकडे पंतप्रधानांचं लक्ष वेधलं आहे. पत्रात त्यांनी काही मागण्या केल्या आहेत. महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लस खरेदी करू द्या, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

या पत्रातून राज्यातील कोरोनाची सद्य परिस्थिती आणि लसींचा निर्माण झालेला तुटवडा याकडे पंतप्रधानांचं लक्ष वेधलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी काही मागण्या केल्या आहेत.

कोरोना चा फटका सर्वात जास्त महाराष्ट्राला बसला आहे.. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातच आहेत आणि दुर्दवी घटना कोरोनामुळे मृत्यूचा दर ही जास्त महाराष्ट्रात आहे. त्यामुळे कोरोणाची लस खरेदी करण्याचे अधिकार द्यावेत.
सारखा सारखा बंद आणि निर्बंध परवडणारे नाहीत.
आपण याकडे लक्ष द्यावे असे अनेक मुद्दे राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहेत.