पत्रकार मनीष गडगे यांचा अपघाती मृत्यू…पाच दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज थांबली..

पत्रकार मनीष गडगे यांचा अपघाती मृत्यू

पाच दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज थांबली

आळेफाटा
विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष, आळेफाटा येथील स्वर्गीय भिमाजीशेठ गडगे यांचे नातु व सामाजिक कार्यकर्ते सुरेशशेठ भिमाजीशेठ गडगे यांचे पुतणे तथा पत्रकार मनीष जालिंदर गडगे यांचा आज रविवार दिनांक 14 रोजी अपघाती मृत्यू झाला. चार दिवसांपूर्वी कल्याण नगर महामार्गावरील ओतुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन चारचाकी वाहनांची धडक होऊन अपघात झाला होता .त्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. आळेफाटा येथील डॉक्टर सोनवणे हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यावर त्यांना आळेफाटा येथील दुसऱ्या खाजगी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यात आले होते … आज रविवारी पहाटे 5.वाजता त्याना श्वसनाचा अति त्रास झाल्याने व ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने त्यांचे
निधन झाले .

त्यांचा अंत्यविधी रविवारी तीन वाजता वडगाव आनंद येथील वैकुंठधाम स्मशानभूमी येथे शोकाकुल वातावरणात झाला.
आळेफाटा वडगाव आनंद .ओतुर नारायणगाव जुन्नर आंबेगाव …खेड येथील व पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी व पत्रकार बांधव मनीष गडगे यांच्या अंत्यविधी साठी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी हळहळ व्यक्त करत शाश्रुनयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला आपला आवाज न्यूज नेटवर्क च्या वतीने मनीष गडगे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *