शिरूर लोकसभा मतदार संघात पार्थ पवार सक्रिय ?

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर : दि. ०९/०१/२०२४.

पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदार संघ सध्या लक्ष वेधून घेत आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जशी फूट पडलीय, तशा या मतदार संघात रोज काहीतरी घडामोडी घडत आहेत. या मतदार संघात खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, हवेलिसह हडपसर या विधान सभा मतदार संघांचा समावेश आहे.
यापैकी पुणे शहराला लागून असलेल्या हडपसर मध्ये पार्थ अजित पवार यांचे मंगळवार दि. ९ जानेवारी २०२४ रोजी भरमसाठ दौरे होते. त्यामुळे आता अजितदादा हे पार्थ पवारांना येथून लोकसभेला उभे करणार का ? अशा चर्चांना उधाण आले आहे.
पार्थ पवार यांचा हडपसर दौरा (०९/०१/२०२४) :-
१) सकाळी ९:०० ते ९:३० :- (मुंढवा) – मा. नगरसेवक बंडू तात्या गायकवाड यांच्या निवासस्थानी भेट.
२) ९:३० ते १०:०० :- (बी टी कवडे रोड) – मा. नगरसेविका सुरेखाताई कवडे यांच्या निवासस्थानी भेट.
३) १०:०० ते १०:३० :- (भीमनगर) – मा. नगरसेवक अण्णा म्हस्के यांच्या निवासस्थानी भेट.
४) १०:३० ते ११:०० :- मा. नगरसेवक शिवाजी पवार यांच्या सोलापूर रोड कॅनाल परिसरातील निवासस्थानी भेट.
५) सकाळी ११:०० ते ११:३० :- (सातववाडी) – माजी नगरसेविका वैशालीताई बनकर यांच्या निवासस्थानी भेट.
६) ११:३० ते १२:०० :- (ससाणेनगर) – मा. नगरसेवक योगेश ससाणे यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट.
७) १२:०० ते १२:३० :- (वैदूवाडी) – मा. नगरसेवक आनंद अलकुंटे यांच्या शंकरमठ येथील जनसंपर्क कार्यालयास भेट.
८) दुपारी १२:३० ते १:०० :- (रामटेकडी) – मा. नगरसेवक अशोक कांबळे यांच्या जनसंपर्क कार्यालय भेट.
९) १:०० ते १:३० :- (सय्यदनगर) – मा. नगरसेवक फारुखनाना इनामदार यांच्या निवासस्थानी भेट.
१०) २:०० वा. :- (कोंढवा) – कार्याध्यक्ष संदीप नाना बधे यांच्या निवासस्थानी भेट.

सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून पार्थ पवार यांच्या या झंझावाती दौऱ्याची जोरदार चर्चा सुरू असून, अनेक विरोधक पुढाऱ्यांचे धाबे दणाणण्याची शक्यता आहे.
पार्थ पवार हे मागील लोकसभा निवडणुकीवेळी मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूकीला उभे होते. त्या ठिकाणी श्रीरंग आप्पा बारणे यांचा विजय झाला होता. परंतु तेव्हापासून पार्थ पवार हे राजकारणात सक्रिय दिसत नव्हते. मात्र अजिदादांनी जेव्हापासून महाराष्ट्रातील भाजप शिवसेना (शिंदे गट) सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तेव्हापासून राज्यातील राजकारण अगदी ढवळून निघालेले आहे. राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवारांना मानणारे व त्यांच्या अगदी जवळच्या आमदारांनी अजित पवार यांच्या सरकारमध्ये जाणे पसंत केले होते. त्यातल्या त्यात पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पच्छिम महाराष्ट्रातील अनेक दिग्गज, अजितदादांसोबत गेले होते. पवारांचा मूळ जिल्हा असणाऱ्या पुणे जिल्ह्यातही अनेक दिग्गज अजितदादांबरोबर गेले होते. मात्र काही आमदार अजूनही तळ्यात मळ्यात करत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र अजिदादांच्या विरोधात गेलेले शिरूर लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार डॉ अमोल कोल्हे हे, शरद पवार यांच्यासोबत ठामपणे उभे राहून त्यांनी डिसेंबर २०२३ मध्ये किल्ले शिवनेरी (जुन्नर) येथून शेतकरी आक्रोश मोर्चा काढून स्वतः त्याचे नेतृत्व केले. या दौऱ्यावेळी खासदार कोल्हे यांनी अजितदादा व भाजप – शिवसेना सरकारवर जोरदार टीका केली होती. या टीकांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सडेतोड उत्तर देत, यावेळी कोल्हे कसे निवडून येतात हेच बघतो अशी वल्गना केलेली होती. त्यामुळे अजिदादा व कोल्हे यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू असल्याचे सर्वांनी पाहिले.
त्यामुळे जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच अजिदादांनी आपले चिरंजीव पार्थ यांना शिरूर लोकसभा मतदार संघातून प्रमोट करण्याचे तर ठरवले नाही ना ? अशी शंका सर्वांच्या मनात येऊ लागली आहे…
त्यामुळे अजून जरी अजित दादांनी शिरूर लोकसभा मतदार संघाचा आपला उमेदवार निच्छित केला नसला, तरी येत्या काही दिवसांत या मतदार संघातील चित्र अजून स्पष्ट होईल…
मात्र आजच्या पार्थ पवारांच्या या दौऱ्याची चर्चा राजकीय वर्तुळाशिवाय जन सामान्यांत जोरदार सुरू आहे.
Portal 1 फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *