पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकिक वाढवण्यात एच. ए. स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचे योगदान – सुनील शिवले

एच.ए.स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या नाटकास उस्फूर्त प्रतिसाद

 

पिंपरी, पुणे : पिंपरी चिंचवड या कामगार नगरीचा नावलौकिक वाढवण्यात
एच. ए. स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. शहराचा इतिहास लिहिताना हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहावे लागेल.
यामध्ये केंद्रीय मंत्रालयात कार्यरत असणारे संकेत भोंडवे, अर्जुन पुरस्कार व शिवछत्रपती पुरस्कार विजेते गोपाळ देवांग, आमदार महेश लांडगे, माजी महापौर आझमभाई पानसरे, योगेश बहल, मनपा विरोधी पक्षनेते कैलास कदम, माजी नगरसेवक हरेश बोधानी, जगदीश शेट्टी, उल्हास शेट्टी, विजय कापसे, सद्गुरू कदम, स्मिता कुलकर्णी, सरपंच विद्या काते – गायकर, डॉ. निलेश भोंडवे, डॉ. गजानन मंकीकर, डॉ. संदीप भिरुड, डॉ. शंतनू साळवेकर, डॉ. गौरी धायगुडे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता कैलास थोरात, बेल्जियम येथुन आलेले मनोहर नटराजन, नेदरलँड येथून आलेल्या स्नेहा भाडळे – जाधव, गुलाब जाधव, युवराज फाळके, ॲड. सुशील मंचरकर, ॲड. मनीषा गवळी, अॕड. मकरंद गोखले आमदार, खासदारांचे स्विय सहाय्यक म्हणून काम पाहणारे मोहन बाबर, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शशांक परमाणे, उपाध्यक्ष गणेश गांवकर, सचिव आशिष म्हसे, अशोक थोरात, बासरी वादक दिपक गोरखे यांचा विशेष उल्लेख करावा लागेल असे प्रतिपादन मुख्याध्यापक सुनील शिवले यांनी केले.
माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूमी पूजन केलेल्या आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्थापन केलेल्या पिंपरीतील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलचे हीरक महोत्सव वर्ष सुरू आहे. त्यानिमित्त माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने स्नेह मेळावा व कला, प्रदर्शन, नाटक आणि ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्याध्यापिका दीपा अभ्यंकर, माजी मुख्याध्यापक परमजीत कौर, ॲड. सत्यनारायण शिरुरे, माजी मुख्याध्यापक कमल माने, वर्षा भोपाळे, एच.ए. कंपनी कामगार संघटनेचे विजय पाटील, संजय देशमुख, राजेंद्र एल. जाधव, उमेश कुलकर्णी, शिक्षक प्रतिनिधी रमेश गाढवे, उपकार्याध्यक्ष श्वेता नाईक, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष समाधान गेजगे आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, माजी विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील वर्ग खोली, विज्ञान प्रदर्शन, कलादालनास भेट दिली.

या नंतर माजी विद्यार्थ्यांनी “ही आवडते मज मनापासून शाळा” हे नाटक आणि नृत्य व ऑर्केस्ट्रा सादर केला. नाटकामध्ये विनायक व्ही.जोशी, शितल तारे, मोहन बाबर, रवी पिल्ले, अर्चना गुणे, आरती भट्टाचार्य, एन. एच. लक्ष्मी, अनुराधा पिल्ले, श्रीनिवास कुलकर्णी, राजेश चिट्टे, आरती भट्टाचार्य, राजन गुणवंत, श्रीनिवास कुलकर्णी, विशाल गोराणे, रंजना देसाई, वंदना कोठी
यांनी सहभाग घेतला. या नाटकास विद्यार्थी, पालक परिवार व शिक्षकांनी देखील टाळ्या वाजवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
संगीता दुधगावकर, विक्रम सिंग गिल, स्वाती पिल्ले, अमृता रावलल्लू, रागिनी मेहता यांनी नृत्य सादर केली.
रत्नाकर वरवडेकर, सुरेश शिंदे, उल्हास आंबेकर, सिद्धार्थ रामचंद्रन, राजन गुणवंत, जितेंद्र महाजन, शैलेंद्र भावसार, प्रसाद कोठी, राजेंद्र गावडे, पद्माकर वरवडेकर, सचिन देठे, बिभास मंडल, रवि पिल्ले यांनी ऑर्केस्ट्रा मध्ये भाग घेतला. आमिर शेख व पराग फडकर यांनी आर्केस्ट्राचा सेट अप केला.
स्वागत शशांक परमाणे, प्रास्ताविक शीतल तारे, सूत्र संचालन रवि पिल्ले आणि आभार अशोक थोरात यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *