शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक

१४ डिसेंबर २०२२


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. अज्ञात व्यक्तीने पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी फोन करून पवार यांना मुंबईत येऊन देशी कट्ट्याने जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती.

धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. नारायण सोनी असं या आरोपीचं नाव असून, तो मूळचा बिहारचा आहे. नारायण सोनीला आज (१४ डिसेंबर) कोर्टात हजर केलं जाणार आहे. याप्रकरणी पोलिसांनी IPC च्या कलम २९४,५०६ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.