आमदार पवार यांच्या हस्ते व रामलिंग महिला उन्नती बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने निर्भिड पत्रकार पुरस्कार प्रदान…

आमदार पवार यांच्या हस्ते व रामलिंग महिला उन्नती बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने निर्भिड पत्रकार पुरस्कार प्रदान
बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिरूर : ०८/०१/२०२४.

मराठी भाषेतील पहिले दर्पण नावाचे पत्रक छापणारे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनी, म्हणजेच ६ जानेवारी या त्यांच्या जयंतीच्या दिवशी सर्वत्र मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर शिरूर येथील रामलिंग महिला उन्नत्ती बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनेही संपदा पतसंस्थेच्या सभागृहात, शिरुर हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार यांच्या हस्ते शिरूरच्या पत्रकारांना “निर्भिड पत्रकार” पुरस्काराने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरवात छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यावेळी शिरूर कृ. उ. बाजार समिती संचालक संतोष मोरे, मा. जिल्हा परिषद सदस्या शोभना पाचंगे, राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष तुषार दसगुडे, उपाध्यक्ष केशव शिंदे उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुभाष शेटे सर, प्रा. सतीश धुमाळ, प्रा रवींद्र खुडे, प्रवीण गायकवाड, अभिजित आंबेकर, तेजस फडके, संतोष शिंदे, अनिल सोनवणे, अर्जुन बढे, भाऊसाहेब खपके, देवकीनंदन शेटे, योगेश भाकरे, विजय पवार, सचिन जाधव, रमेश देशमुख, फैजल पठाण, शोभा परदेशी, अश्विनी सांगळे, किरण झांबरे, रुपाली खिल्लारी यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रा सुभाष शेटे, प्रा सतीश धुमाळ, प्रा रवींद्र खुडे, प्रवीण गायकवाड, संतोष शिंदे, अर्जुन बढे, अभिजित आंबेकर व तेजस फडके या पत्रकार बांधवांनी मनोगते व्यक्त केली.


यावेळी अनेकांनी पत्रकारांच्या समस्या आमदार पवार यांच्या समोर मांडून, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे अनेक मागण्याही केल्या. त्यात प्रामुख्याने पत्रकार भवन, पत्रकार निवास, विमा संरक्षण, मेडिक्लेम ई. शासन दरबारी तातडीने मांडण्याच्या मागण्या केल्या.
यावेळी शिरूर हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार यांनी पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा देताना सांगितले की, “पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यांचे कार्यही विविध संघटनांच्या माध्यमातून चालू असते. सर्वांनी एकत्र येऊन कार्य केले, तर निश्चितच त्यांच्यासाठी सरकारकडून विविध योजना राबविल्या जाऊ शकतात. त्यासाठी मी या भागाचा आमदार म्हणून नेहमी प्रयत्नशील राहील. तसेच राणीताई कर्डिले यांचे रामलिंग महिला उन्नती बहुद्देशिय सामाजिक संस्था, तसेच शिरूर पोलीस स्टेशन महिला दक्षता समिती अध्यक्षा या नात्याने व अनेक संघटनांच्या पदाधिकारी या माध्यमातून चांगले काम सुरू असून, त्यामाध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबवित आहे. या सर्वांच्या उत्तम कार्यास समाजाचीही चांगली साथ असते. असेच कार्य त्यांच्याकडून पुढेही चालू राहो याच शुभेच्छा मी व्यक्त करतो.”
या कार्यक्रमाच्या औचीत्याने, “रामलिंग महिला पतसंस्था दिनदर्शिका २०२४” चे प्रकाशन आमदार पवार व पत्रकार बांधवांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमासाठी संगीता शेवाळे, डॉ स्मिता कवाद, गीताराणी आढाव, श्रुतिका झांबरे, शीतल शर्मा, ज्योती पारधी, रुपाली बोर्डे, अर्चना गायकवाड, मोनिका जाधव, लता इसवे, डॉ वैशाली साखरे, कलिम सय्यद, हाफिज बागवान, राहील शेख, सागर नरवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरूर वी का से स सोसायटी संचालक शरद पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *