ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूलमध्ये “Incredible India” हा अनोखा कार्यक्रम उत्साहात साजरा…

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर : दि. २८/१२/२०२३.
शिरूर येथील ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे “Incredible India” हा एक आगळा वेगळा कार्यक्रम, रविवार दि. १७ डिसेंबर २०२३ रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला. याचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच छताखाली संपूर्ण भारत देशाच्या प्रत्येक राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न केलेला होता. यात प्रत्येक राज्याची भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक व जवळ जवळ संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला होता. त्या त्या राज्यातील पोशाख, खाद्य पदार्थ, भाषा, नृत्य इत्यादी हुबेहुब मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. या सर्व गोष्टी पाहून उपस्थित भारावून गेल्याचे दिसत होते. त्यामुळे आपल्या पाल्यांचे कौतुक म्हणून व समस्त शिरुरकरांना पाहण्यासारखा देखणा हा कार्यक्रम असल्याचे, पालक व उपस्थित मान्यवरांचे म्हणणे होते. त्यामुळे हा कार्यक्रम समस्त शिरूरकरांसाठी खुला असायला हवा होता व तो पुढे सर्वांसाठी खुला असावा, अशी मागणी शाळा व्यवस्थापनाकडे सर्वांनी केली.
कार्यक्रमाचे उद्घाटन शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ राजेराम घावटे, उपाध्यक्ष दीपक घावटे, सेक्रेटरी सविता घावटे, संचालक सुधीर शिंदे, संचालिका अमृता घावटे, सीईओ डॉ नितीन घावटे, ज्येष्ठ पत्रकार प्रा सतीश धुमाळ, आपला आवाज न्यूज नेटवर्कचे विभागीय संपादक प्रा रवींद्र खुडे, डॉ. अखिलेश राजूरकर , डॉ. विवेक महाजन, सामाजिक कार्यकर्ते शामकांत वर्पे, डॉ. पाठक मॅडम, सामाजिक कार्यकर्त्या शशिकला काळे, सुवर्णा सोनवणे व लता नाझीरकर, तसेच प्रशांत जाधव, सुनील मुसमाडे, गणेश देशमुख, प्राचार्या रूपाली जाधव, प्राचार्य संतोष येवले, मुख्याध्यापिका सुनंदा लंघे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या मेहनतीने उत्कृष्टरित्या पार पडल्याची माहिती संस्थेचे सीईओ डॉ नितीन घावटे यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनाप मॅडम यांनी केले. तर आभार जाधव मॅडम यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *