शिरूर येथे येशू जन्मोत्सव मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.

पुणे जिल्ह्यातील शिरूर नगर परिषदेच्या मंगल कार्यालयामध्ये, गुरुवार दि. २१ डिसेंबर २०२३ रोजी येशू जन्मोत्सव समिती शिरूर तालुक्याच्या वतीने, येशू जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले होते. या जन्मोत्सवामध्ये प्रथम स्तुती आराधना करण्यात आली. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प व शाल देऊन स्वागत करण्यात आले.
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शिरूर तालुक्यातील सर्व पाळक, संतोष खोतकर, तुषार कांबळे, संतोष गोरखे, फ्रांसीस महांकाळे, शिंदे दादा, प्रशांत घोडे, विल्सन भोसले, सुनील बरे, फुल्सिंग मावळे, सुधीर कोनेसागर, कोमल भगवे, कमल साळवे, तावरे सिस्टर, सपना अमळनेरी, रणखांबे, विश्वास साळवे, इंद्रजित कदम, घोरपडे, प्रवीण कदम आदींचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर शिरूर तालुक्यातील सर्व चर्च लिडरला गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
येशू जन्मोत्सवानिमित्त सर्वांसाठी प्रार्थना करण्यात आली व येशूच्या वचनाद्वारे बोध करण्यात आला.
यावेळी देवाचे दास पा. पॉल यांनी बोलताना सांगितले की, येशू ख्रिस्त हे जात धर्म बदलण्यासाठी नाही, तर जीवन बदलण्यासाठी आले आहे. येशू ख्रिस्त हे जगामध्ये सर्वांना प्रेम, शांती देण्यासाठी व त्यांच्या पापातून सोडवण्यासाठी आले आहेत”

या कार्यक्रमासाठी पॉल दास, शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार, निवासी नायब तहसीलदार स्नेहा गिरगोसावी, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक, बामसेफ इंटक चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ मगन ससाणे, भाजपा शिरूर शहर अध्यक्ष व माजी नगरसेवक नितीन पाचर्णे, राष्ट्रवादीचे बिजवंत शिंदे, माजी नगरसेवक व भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनोद भालेराव, नगरसेवक मंगेश खांडरे, राष्ट्रवादीचे शिरूर शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, हरिभाऊ विर, जनता दलाचे शिरूर तालुका अध्यक्ष संजय बारवकर, मनसेचे माजी शिरूर शहराध्यक्ष अविनाश घोगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिरूर तालुका महिला अध्यक्षा संगीता शेवाळे, हाफिज बागवान, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक अध्यक्ष राजुद्दीन सय्यद, बहुजन पालक संघाचे राज्य संयोजक नाथाभाऊ पाचर्णे, बहुजन मुक्ती पार्टीचे फिरोज सय्यद, सागर घोलप, गौरव रावडे, आशिर्वाद ढगे, मराठा महासंघाचे योगेश महाजन, पत्रकार सतीश धुमाळ, लहुजी शक्ती सेनेचे माजी शहराध्यक्ष विशाल जोगदंड, भीमसेवा संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष चेतन साठे, ॲड अमोल पठारे, कांग्रेस पक्षाचे नगर जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत उजागरे, प्रमोद गायकवाड, वैभव महाराज जोशी, प्रा डॉ कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन शिरूर शहर येशू जन्मोत्सव समितीचे युवराज राजु सोनार, विपुल राऊत, मधुकर सेनानी, अरुण रणदिवे, अजिंक्य सुर्यवंशी, फ्रान्सिस म्हणकाळे, तुषार कांबळे, संतोष गोरखे, बापू रणदिवे, विनोद चोथमल, संजय अमळनेरी, शुभम गायकवाड, शुभम वाकचौरे, जय गायकवाड, सॅम भगवे, देवीसिंग चव्हाण, देवराम भोसले यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *