देहूत कचरा डेपोला लागली आग परिसरात धुराचे लोट

०९ नोव्हेंबर २०२२

देहूगाव


देहूगाव येथील कचरा डेपोला मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आग लागली होती . तीन अग्निशामक दलाच्या गाड्यांच्या मदतीने दोन तासाच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली . दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही दरम्यान माहिती मिळूनही पिंपरी चिंचवड महापालिकेने बंब पाठविलाच नाही . कचरा डेपो रस्त्यापासून हलवावा अशी मागणी वारंवार केली जात आहे याबाबत एका समितीची नियुक्ती करण्यात आलेली आहे . या समितीच्या माध्यमातून कचरा डेपोची जागा निश्चित करण्यात आली आहे त्याचप्रमाणे यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या व अहवाल घेण्याचे काम नगरपंचायतीच्या वतीने सुरू आहे . आत्तापर्यंत केवळ पुरातत्व विभागाच्या वतीने अहवाल नगरपंचायतीला देण्यात आलेला आहे घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष स्मिता चव्हाण योगेश काळोखे , गटनेते योगेश परंडवाल नगरसेवक आनंदा काळोखे , पर्यवेक्षक संदीप कुराडे , ज्ञानेश्वर निकम यांनी घटनास्थळी धाव घेतली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *