ओम साई सेवा मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर

२५५ जणांनी केले रक्तदान

नारायणगाव :- ( वाजगे, कार्यकारी संपादक.)
ओम साई सेवा मंडळ, वारूळवाडी – नारायणगाव यांच्या वतीने आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रति शिर्डी द्वारकामाई म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र साई मंदिरात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये २५५ जणांनी रक्तदान केले.


या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक साई भक्तांसह महिला भक्तही रक्तदान शिबिरात सहभागी झाल्या होत्या. तसेच नारायणगाव विविध कार्यकारी सोसायटीचे उपाध्यक्ष पत्रकार किरण वाजगे यांनी ४७ व्या वेळी रक्तदान केले. मांजरवाडी येथील पिंटो इलेक्ट्रॉनिक्स ग्रुपच्या १३ कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी रक्तदान केले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी संजय वारुळे, विनायक रसाळ, सुजित खैरे, सदानंद खैरे, सुदीप कसाबे, राजेंद्र डेरे, श्रीकांत वायाळ, रुपेश वाजगे, ज्ञानेश मेहेत्रे, हेमंत बेल्हेकर, प्रसाद उर्फ टल्या दळवी, संदीप शिंदे, सुरज जोशी, शिवाजी बोराडे, सचिन दरेकर, हेमंत कांबळे, कुमार गायकवाड, संजय फुलसुंदर, शेखर वारूळे, बाजार समितीच्या संचालिका आरती वारुळे, अभिजित थोरात यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *