पिंपळवंडीतील एटीएम मशीन फोडणाऱ्या दोघांना अटक तर एक फरार…आळेफाटा पोलिसांची दबंग कारवाई..

आळेफाटा, 10/05/2021

विभागीय संपादक रामदास सांगळे

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे बुधवारी (दि.६) मध्यरात्री तीन अज्ञात चोरट्यांनी पिंपळवंडी (ता.जुन्नर) येथील बॅक आँफ महाराष्ट्रचे एटीएम मशिन व चार दुकाने फोडली होती.त्यानंतर आळेफाटा पोलिसांनी तपास करुन राजेंद्र जाधव व कैलास काळे (दोघेही रा.गुरेवाडी ता- पारनेर, जि.अहमदनगर) यांना ताब्यात घेतले असून संतोष उर्फ विजय जाधव फरार आहे. आळेफाटा पोलिसांनी ३ दिवसात तपास केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत आळेफाटा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी दिलेली माहिती अशी की बुधवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी पिंपळवंडी येथील बॅक आँफ महाराष्ट्रचे एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ए टी एम मध्ये पैसे नसल्यामुळे या चोरट्यांचा हिरमोड झाला. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा पिंपळवंडी बसस्टॅडकडे वळविला सर्वप्रथम त्यांनी लक्ष्मी खानावळ या हाॅटेलच्या शटरचे कुलुप तोडून आत प्रवेश केला व हाॅटेलमधील किरकोळ चिल्लर व शितपेयाच्या बाटल्या चोरी केल्या त्यानंतर त्यांनी बाजुला असलेल्या जेष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयावर कुलूप तोडले. त्या ठिकाणीही त्यांना काही मिळाले नाही त्यानंतर या चोरट्यांनी या कार्यालयाच्या शेजारी असलेल्या मोटारवायडींग दुकानाचे शटर उचकटून किरकोळ चोरी केली. त्यानंतर अस्मिता किराणा या दुकानाचे शटर उचकटून दुकानातील काही रक्कम चोरून नेली या घटनेची दृश्य सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली होती. या फुटेजच्या आधारे आळेफाटा पोलिसांनी तपास करुन राजेंद्र जाधव व कैलास काळे (दोघेही रा- गुरेवाडी,ता.पारनेर, जि अहमदनगर) यांना ताब्यात घेतले असता त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. तर या घटनेमधील एक आरोपी संतोष उर्फ विजय जाधव फरार झाला असून पोलिस त्याचा शोघ घेत आहे. सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर पवार, पोलीस नाईक नीलकंठ कारखेले,पोलीस नाईक लहानु बांगर,पोलीस अंमलदार महेश काठमोरे, अरविंद वैद