मावळ चे खासदार श्रीरंग बारणे यांना मिळणार लोकसभा सभागृहात पीठासीन अधिकारी म्हणून काम करण्याची संधी…

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली श्रीरंग बारणे यांच्या नावाची घोषणा

देशाचे सर्वोच्च सभागृह असलेल्या लोकसभेच्या सभागृहात पीठासीन अधिकाऱ्याचे कामकाज करण्याची संधी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना मिळणार आहे.श्रीरंग अप्पा बारणे यांची तालिका अध्यक्षपदाच्या पॅनेलवर नियुक्ती करण्यात आली. लोकसभा अध्यक्ष श्री. ओम बिर्ला यांनी सभागृहात श्रीरंग बारणे यांच्या नावाची घोषणा केली. सभागृहातील सदस्यांनी बाके वाजवून त्यांचे स्वागत केले. पिंपरी-चिंचवडच्या भूमिपुत्राला लोकसभा सभागृहात पीठासीन अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळत आहे, ही निश्चितच तमाम पिंपरी-चिंचवडकरांसाठी अभिमानाची बाब आहे. या आधी खासदार अप्पा बारणे यांना संसदरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे…मावळ लोकसभा मतदारसंघातून खासदार असलेले श्रीरंग अप्पा बारणे आता देशाच्या सर्वच असलेल्या सभागृहात पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार असल्याने मावळ लोकसभा व पुणे जिल्ह्य़ातील बारणे समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *