महाराष्ट्र राज्य गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा,महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम नुसार गाडी चालक, मालक यांच्यावर गुन्हा दाखल

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
२० सप्टेंबर २०२१

गंगापूर

Case filed against driver and owner under Maharashtra State Cattle Slaughter Prevention Act, Maharashtra Animal Protection Act
महाराष्ट्र राज्य गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा,महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम नुसार गाडी चालक, मालक यांच्यावर गुन्हा दाखल

घोडेगाव पोलिस व बजरंग दल गोरक्षकाची कारवाई

अनंत चतुर्दशी म्हणजे गणेश विसर्जनाच्या दिवशी ५ वासरांना(गोवंश) वाचविण्यात बजरंग दलाच्या गोरक्षकांना यश आले आहे.मंगळवार दि १९ रोजी बजरंग दल घोडेगाव प्रखंड गोरक्षा प्रमुख प्रशांत साबळे यांना गोरक्षक स्वप्निल कोकणे यांच्याकडून माहिती मिळाली की पिंपळगाव(घोडे) पोखरकर वाडी येथून एक पिक अप नंबर MH 14 JL 2329 यात ५ वासरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे कळाले प्रशांत साबळे यांनी या संबंधीत माहिती घोडेगाव पोलिसांना तातडीने कळवली असता, प्रशांत साबळे व घोडेगाव पोलिसांनी सापळा रचून रात्री ८.१५ वाजल्याच्या सुमारास . पिंपळगाव (घोडे) गावच्या हद्दीत गाडी थांबून चौकशी केली असता.गाडीत ५ वासरे अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेली दिसून आली. गाडीमध्ये त्यांना कुठलीही चारा पाण्याची सोय केलेली नव्हती. सदर गाडी चालक सतीश कचरदास खंडागळे याच्याकडे चौकशी केली असता.त्याने सांगितले की शकील बाबामिया मोमीन उर्फ राजू इनामदार याचे सांगण्यावरून हि ५ वासरे ही जुन्नरला कत्तल करण्यासाठी घेऊन चाललो आहे. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने सदर वाहन घोडेगाव पोलीस स्टेशन येथे आणून घोडेगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. 203/2021 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5(अ),5(ब),9, प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनीयम 1960 चे कलम 11(1)(घ)(झ) नुसार गाडी चालक, मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व वासरे भोसरी येथील पुणे पांजरपोळ ट्रस्ट येथे सुखरूप सोडण्यात आली आहे. या कारवाईत घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने व इतर पोलिस कर्मचारी यांचे विशेष सहकार्य मिळाले.या कारवाईत,बजरंग दलाचे प्रशांत साबळे, स्वप्नील कोकणे, युवराज राऊत, सागर काळे, सुरज धराडे, सनी शेटे, आदिनाथ हुले आदि गोरक्षक सहभागी झाले होते या घटनेचा अधिक तपास घोडेगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी साहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक वागज हे करत आहे.

Ghodegaon Police and Bajrang Dal Gorakshaka's action

 

 

 

 

 

 

 

 

 

घोडेगाव पोलिस व बजरंग दल गोरक्षकाची कारवाई

Ghodegaon Police and Bajrang Dal Gorakshaka's action
महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम नुसार गाडी चालक, मालक यांच्यावर गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *