विघ्नहर सहकारी साखर कारखान्याकडून शेतकरी आणि कर्मचारी यांची दिवाळी होणार गोड – सत्यशिलदादा शेरकर

उसाला विनाकपात 3050/- रुपयांचा दर जाहीर

विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा 38 वा गळीत हंगाम दिनांक 01/11/202 रोजी सकाळी 10 वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी खास माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात माजी सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आमदार अतुल बेनके यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी उपस्थित राहणार होते. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळावं याबाबत राज्यभर साखळी उपोषण सुरू आहे. आणि हे आरक्षणाबाबतच आंदोलन अधिक तीव्र झाल्याने आणि गावोगावी राजकीय नेत्यांना येण्यासाठी बंदी केल्यामुळे दिनांक 2 नोव्हेंबर 2023 रोजी होणारा कार्यक्रम रद्द करून दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला असून मराठा आरक्षणाबाबत साखळी उपोषणाला बसलेले मराठा बांधव यांचे समन्वयक आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा मोळी टाकण्याचा कार्यक्रम संपन्न होईल अशी माहिती  चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांनी दिली आहे. पाहुयात आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी घेतलेला हा आढावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *