दोन खंडणीखोर आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात

रामदास सांगळे
विभागीय संपादक
२८ डिसेंबर २०२१

आळेफाटा


आळेफाटा पोलिसांनी वीस लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी दोन खंडणीखोरांना ताब्यात घेतले आहे. अमर गंगाराम सहाने (रा.आळे ता.जुन्नर,जिल्हा.पुणे) व संजय सिताराम कुऱ्हाडे (लवनवडी ता.जुन्नर जिल्हा पुणे) असे अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. जून २०१८ ते २५ डिसेंबर २०२१ दरम्यान ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळेचे अध्यक्ष भाऊ लक्ष्मण कुऱ्हाडे (वय ६०) यांना भेटून तुमच्या संस्थेत खूप मोठे घोटाळे व भ्रष्टाचार चालले आहेत, तुम्ही संस्थेच्या लगतची गायरान जागा बळकावली आहे.

तुमचे सर्व धंदे हे बेकायदेशीर आहेत, संस्थेच्या परवानग्या व इतर कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्यान्वये मागणी करून त्यात काहीच निष्पन्न न झाल्याने काही ना काही कारणावरून खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन अध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे व त्यांच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन वीस लाख रुपये खंडणीची मागणी करून दोन लाख रुपये बळकावले आहेत. उर्वरीत पैशाची पुन्हा मागणी चालू केल्याने फिर्यादी भाऊ कुऱ्हाडे यांनी आळेफाटा पोलिस चौकीत रीतसर फिर्याद दाखल केली आहे. आरोपी संजय कुऱ्हाडे व अमर सहाणे यांच्यावर कलम क्रमांक 385, 386 ,387, 504, 506 , 34 अन्वये आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अशी माहिती आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर यांनी दिली. सदर आरोपींवर यापूर्वीही जुन्नर, ओतूर, आळेफाटा पोलीस चौकीत पाच खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. अशाप्रकारे सदर आरोपींनी इतर कोणाची फसवणूक केली असेल,तर त्यांनीही आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये न घाबरता आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करावेत असे आवाहन पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी केले आहे. सदर प्रकरणाचा आधिक तपास पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर करत आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *