पिंपळे गुरव येथे काव्यात्मा काव्यजागर कविसंमेलन शानदारपणे पार पडले

मराठवाडा जनविकास संघ प्रांगणात काव्यात्मा काव्यजागर कविसंमेलन शानदारपणे पार पडले, यावेळी व्यासपीठावर मान्यवर ज्येष्ठ कवयित्री ललिता श्नीपाल सबनीस, मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार , अध्यक्ष म्हणून विश्वरत्न इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष व्यंकटराव वाघमोडे, काव्यात्मा साहित्य परिषदचे उपाध्यक्ष संजय साळुंखे , काव्यात्मा साहित्य परिषदेचे सचिव शामराव सरकाळे आणि काव्यात्मा साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आत्माराम हारे यांची उपस्थिती होती.ज्येष्ठ कवयित्री ललिता श्नीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व वृक्षाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात केली , सुरुवातीला गझलकार अनिल नाटेकर यांनी स्वागत गीत सादर केल्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे प्रसिद्ध साहित्यिक श्नीकांत चौगुले, सागर वाघमारे आणि दादाभाऊ ओव्हाळ यांचा स्मृतिचिन्ह शाल आणि ग्रंथ देऊन ज्येष्ठ कवयित्री, लेखिका ललिता श्नीपाल सबनीस यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.श्नीकांत चौगुले म्हणाले , ” ज्यांच्याकडे देण्यासारखे खुप असते पण देण्याची इच्छा नसते परंतू ज्याच्याकडे काही नसते तरी सुद्धा मनापासून देतात म्हणून हा काव्यात्मा साहित्य परिषदेचा सन्मान मनापासून स्विकारतो.”असे मत व्यक्त केले.

 


वृक्षमित्र अरुण पवार म्हणाले , ” कविता अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडते म्हणून समाजात प्रेमभावना टिकून आहे याचे श्नेय कवितेला जाते.माणसांनी एकमेकांना समजून उमजून मदत करणे गरजेचे आहे कारण आई-वडील आणि वृक्षांनी केलेले संस्कार जीवनात आनंदाची निर्मिती करतात यासाठी आई-वडलांची काळजी घेण्याबरोबर वृक्षलागवड करुन त्यांचे संवर्धन करणे तितकेच गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.
मनोगतात ज्येष्ठ लेखिका, कवयित्रीं ललिता सबनीस म्हणाल्या,”कवितेमध्ये परिवर्तन निर्माण करण्याची उर्जा असते.कवितेतून समाज जागृती होते.कविता माणसाच्या मनापर्यंत जाऊन पोहचते म्हणून महिलांच्या सक्षमीकरणासाठी कवीची महत्वपूर्ण जबाबदारी असल्याचे त्यांनी “पुतळा”कविता सादर करुन सुचित केले.अध्यक्षीय मनोगतात व्यंकटराव वाघमोडे म्हणाले, “कविता संस्कार आणि संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी महत्वाचे कार्य करते म्हणून समाजात शांतता,प्रेम आणि जिव्हाळा टिकून आहे.सर्व जातीभेद विसरून कार्य करणारी कविता जगाला मानवतेच्या धाग्याने बांधून ठेवते.महिलांना प्रतिष्ठा आणि संरक्षण देण्यासाठी सकारात्मक उर्जेचा स्त्रोत निर्माण करते म्हणून कविंनी काव्यातून खराखुरा इतिहास टिकवून ठेवला पाहिजे यासाठी कवींनी ऐतिहासिक कविता लिहिल्या पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी निमंत्रित कवी व उपस्थित कविंनी शेतकरी,आई वडील ,मैत्री ,प्रेम ,विरह , समाजकारण, राजकारण अशा विविध विषयांवर कविता सादर केल्या यात शोभा जोशी,प्रज्ञा दिवेकर, नंदकुमार मुरडे, प्रदीप गांधलीकर, अनिल नाटेकर, उमेंद्र बिसेन,विजय जाधव , दत्तू ठोकळे , कैलास भैरट, राहुल भोसले, जितेंद्र चौधरी ,किसन म्हसे,भगवान गायकवाड ,सुनिता घोडके, अरुण घोडके व नितीन भोसले इ.जवळपास २४ कवींनी शानदारपणे कविता सादर केल्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आत्माराम हारे यांनी केले , सूत्रसंचालन कवी भरत बारी यांनी केले तर आभार शामराव सरकाळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *