भंडारा डोंगरावर उभारल्या जात आहे 125 कोटी रूपयांचे जगद्गुरू श्री.संत तुकाराम महाराज मंदिर

२४ ऑक्टोबर २०२२

बारामती


रविवार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी श्री. क्षेत्र भंडारा डोंगर येथे १२५ कोटींचे उभे राहत असलेल्या भव्य जगद्गुरु श्री. संत तुकाराम महाराज मंदिर संदर्भात गोविंद बाग, बारामती येथे राष्ट्रीय नेते व देशाचे मा. संरक्षण व कृषी मंत्री शरदचंद्र पवार ह्यांची भेट घेतली. ह्या प्रसंगी तीर्थ क्षेत्र भंडारा डोंगर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष बाळासाहेब काशिद पाटील आणि ह्या भव्य मंदिराच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात समाज जागृती करणारे शब्दप्रभू ह.भ.प पंकज महाराज गावडे सोबत होते.

मा.कृषी मंत्री शरद पवार यांना सुरू असलेल्या कामा बाबत ट्रस्ट च्या वतीने देण्यात आली माहीती

ह्यावेळी माजी आमदार विलास लांडे यांनी मंदिराच्या भव्य कामाची पार्श्वभूमी सांगितली.अध्यक्ष बाळासाहेब काशिद पाटील ह्यांनी मंदिराचे स्वरूप आणि सुरू असलेल्या कामाची माहिती देऊन शरद पवार ह्यानी मंदिरा बाबत विचारलेली अधिक माहिती विस्तृत विशद केली व मंदिराचे बजेट, बांधकाम, बांधकाम शैली, त्याबाबत होत असलेले प्रयत्न ह्याबाबत सविस्तर सांगितले. ह्यावेळी शब्दप्रभू पंकज महाराज गावडे ह्यांनी ह्या मंदिरा मागचा आध्यात्मिक व सामाजिक उद्देश, गरज आणि भविष्य कालीन पुढील पिढ्यांसाठी भव्य मंदिरांचे काम कसे व का गरजेचे आहे ह्या बाबत साहेबांच्या बरोबर चर्चा केली.

ट्रस्ट चे अध्यक्ष बाबासाहेब काशिद,ह.भ.प.पंकज महाराज गावडे मा.आमदार विलास लांडे यांनी घेतली शरद पवार यांची भेट

ह्या वेळी शरद पवार यांनी सर्व माहिती घेतल्यानंतर अतिशय समाधान व आनंद व्यक्त केला आणि जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिराच्या कामासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या. ह्या वेळी वारकरी शिक्षण संस्था आळंदी प्रकाशित वै. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कृत सार्थ ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि तुकाराम महाराजांच्या जीवनावरील पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन शरद पवार यांचा श्री.विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट चे वतीने सन्मान करण्यात आला. त्यानंतर संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे ह्यांची भेट घेऊन त्यांना ही माहिती देण्यात आली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *